लाख प्रयत्न करूनही ‘दाढी’ आणि ‘मिशी’ मनासारख्या दाट वाढत नाहीत ?, ट्राय करा ‘हे’ 7 घरगुती उपाय, इन्स्टंट होईल फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दाढीमुळे पुरूषांचा चेहरा आणि व्यक्तीमत्व उठून दिसते. ज्याप्रमाणे मुली आपल्या मेकअपच्या सामानाबाबत खुप कॉन्शियस असतात, अगदी तशीच पुरूषांमध्ये दाढीची क्रेझ असते. सध्या तरूण मुले क्लिनशेव ऐवजी थोडी दाढी ठेवणे पसंत करतात. मात्र, अनेकदा असे होते की, दाढी त्यांना जेवढी दाट हवी असते, तेवढी वाढ दाढीत होत नाही. अशावेळी कोणता घरगुती उपाय करावा, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे उपाय करा

1. खोबरेल तेलात कडीपत्ता टाकून उकळवा. जेव्हा ते थंड होईल तेव्हा आपली दाढी आणि मिशीच्या भागाला तेलाने मसाज करा.

2. आवळ्याच्या तेलाने चेहर्‍याला रोज 20 मिनिटे मसाज करा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाक. याशिवा आवळा तेलात मोहरीची पाने मिसळून बनवा. ही पेस्ट दाढी आणि मिशीच्या भागाला आठवड्यातून तीन ते चारवेळा लावा.

3. दालचीनी पावडरमध्ये लिंबूचा रस मिसळून तो दाढी आणि मिशीच्या भागाला लावा.

4. कांदा मिक्सरला लावून वाटून त्याचा रस काढून घ्या. नंतर रोज झोपण्याच्या एक ते दोन तास अगोदर दाढी आणि मिशीच्या भागावर हा रस लावा.

5.यूकेलिप्टस तेल सुद्धा दाढी आणि मिशीसाठी लाभदायक आहे. पण हे थेट चेहर्‍यावर लावल्यास खाज सुटते. यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून लावा.

6. रोज किमान आठ ग्लास पाणी प्या.

7. व्हिटॅमिन बी रोज घ्या. व्हिटॅमिन बी वन, बी 6 आणि बी 12 ने दाढी, मिशीची वाढ लवकर होते.