Lips Care With Home Remedies : फाटलेल्या ओठांपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ 4 घरगुती उपचार करून पहा

पोलीसनामा ऑनलाईन – कोरडे, उकललेले आणि फाटलेले ओठ तुमच्या चेहऱ्यावरील चमक काढून घेतात. आपण त्वचेची जितकी काळजी घेतो, तितकीच आपल्या ओठांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या शरीराच्या त्वचेपेक्षा आपल्या ओठांची त्वचा अधिक पातळ आणि नाजूक असते. या नाजूक ओठांवर सूर्यप्रकाश, प्रदूषण, थंडी आणि उष्णतेचा परिणाम अधिक होतो. कोरड्या हवेत ओठ कोरडे होऊ लागतात आणि दिसताना खूप वाईट दिसतात. ओठांमध्ये तेलाच्या ग्रंथींचा अभाव असतो. ते स्वतःच त्वचेमध्ये ओलावा राखू शकत नाहीत. म्हणूनच आपल्याला ओठांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काही घरगुती उपचारांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा उपयोग तुम्ही तुमचे ओठ कोमल आणि मऊ बनवू शकता.

खोबरेल तेल
नारळाच्या तेलात असलेले फॅटी ऍसिड तुमचे ओठ गुळगुळीत करते तसेच त्यांना पोषणही देते. हे तेल अगदी थोड्या प्रमाणात ओठांवर लावा आणि काही सेकंद ओठांचा मसाज करा. या तेलाने दिवसातून दोनदा ओठांना मालिश करा. तेल लावल्यानंतर काहीही न खाण्याचा प्रयत्न करा.

कोरफड जेल वापरा
एलोवेरा जेलमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करतात. कोरफडीच्या एका पानातून जेल काढा आणि ते हवाबंद पात्रात ठेवा. रोज रात्री झोपायच्या आधी ते आपल्या ओठांवर लावा आणि सकाळी ओठ धुवा. याचा वापर केल्याने तुमचे ओठ फाटलेले दिसणार नाहीत.

मध
मध फक्त घसा आणि खोकला बरा करण्यासाठीच वापरले जात नाही, तर कोरड्या ओठांपासून मुक्त होण्यास देखील मदत करते. हे एक मॉइश्चरायझर आहे, जे फाटलेल्या ओठांना बरे करते. यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात, जे ओठांमध्ये कोणत्याही प्रकारचे संसर्ग रोखतात.

साखर
फाटलेल्या ओठांसाठी साखरेचे मोठे दाणे सर्वोत्कृष्ट एक्सफोलिएटर आहेत. साखरेने ओठ चोळण्यामुळे ओठांवरील कोरडा आणि मृत पेशींचा वरचा थर निघून जाण्यास मदत होईल.

एक चमचा साखर, एक चमचा ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. आता ते आपल्या ओठांवर हळुवारपणे लावा. नंतर थोड्या वेळासाठी ते तसेच राहूद्या. थोड्या वेळानंतर पाण्याने गुळणा करा आणि ओठ हलक्या हाताने कोरडे करा. याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेवरील कोरडी त्वचा निघून जाईल आणि त्वचा मऊ होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like