Dry Hands Tips : सतत हात धुण्याने त्वचा होतेय ड्राय तर फॉलो करा या 5 टीप्स, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस महामारीने सर्वांना स्वच्छतेचे महत्व शिकवले आहे. विशेषकरून जोपर्यंत या धोकादायक आजारावर उपचार किंवा वॅक्सीन उपलब्ध होत नाही, तोपर्यंत खबरदारीच सर्वात चांगला बचाव आहे. जेव्हापासून या जीवघेण्या आजाराची सुरूवात झाली आहे, तेव्हापासून सर्व लोकांनी हातांची स्वच्छता विशेषकरून सुरू केली आहे. दिवसात अनेकदा हात धुणे आणि सोबतच सतत सॅनिटायझर वापल्याने त्वचा खुपच कोरडी होते. अशावेळी हाताचे सौंदर्य राखण्यासाठी आणि ओलावा राखण्यासाठी जास्त काळजी घेतली पाहिजे.

अशी घ्या काळजी
1 केमिकल्सयुक्त हँडवॉश
चांगल्या हँडवॉशची निवड करा. कमीत कमी केमिकल्स वापरलेला हँडवॉश घ्या.

2 हँडक्रीम
हात धुतल्यानंतर हँडक्रिमचा वापर करा.

3 व्हॅसलीन
त्वचा जास्त कोरडी पडली असेल तर व्हॅसलीन वापरा.

4 लिंबू आणि ग्लिसरीन
एका बाटलीत समप्रमाणात ग्लिसरीन, गुलाब जल आणि एका लिंबाचा रस मिसळून ठेवा. रोज झोपण्यापूर्वी हात आणि पायांना लावून मालिश करा.

5 तेल मालिश
खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करा.

You might also like