Honey Face Pack Benefits : हिवाळ्यात चेहऱ्याला मॉइश्चरायझर ठेवेल मधाचा फेसपॅक, जाणून घ्या फायदे आणि रेसिपी

पोलीसनामा ऑनलाइन – आपला चेहरा कितीही सुंदर असला तरीही, जर त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर चेहर्‍याचे सौंदर्य खुलून दिसत नाही. हिवाळ्यात कोरडी त्वचा अधिक कोरडी होते. त्वचा कोरडे होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रदूषण आणि आपले खाणे-पिणे. जर कोरडी त्वचा असेल तर खाज सुटणे, आग होणे आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

बाजारात कोरडेपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी, अनेक केमिकल आधारित क्रीम, मॉइश्चरायझर्स, लोशनसह अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु केमिकलचा आधार घेतल्यामुळे त्वचेला फायद्याऐवजी बर्‍याचदा नुकसान होते. त्वचेचे कोरडेपणा दूर करण्यासाठी मध सर्वोत्तम पर्याय आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मध एक केमिकल मुक्त उपाय आहे. मधात उच्च संभाव्य बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधात्मक गुणधर्म असतात, जे त्वचेच्या आत आणि बाहेरील हानीकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास सक्षम असतात. चला तर मग मधाच्या फेसपॅकबद्दल जाणून घेऊया, ज्याचा वापर केल्याने तुमची त्वचा मऊ होईल आणि त्वचेला ग्लो येईल.

मधात शरीर डिटॉक्स करण्याची उत्कृष्ट क्षमता असते, ते रक्त शुद्ध करते. त्वचेवर मध लावल्याने आग कमी होते, तसेच हानिकारक जीवाणू नष्ट होतात. मध त्वचेतील काळ्या डागांना बरे करण्यास देखील मदत करते.

मध आणि हळद फेस पॅक
साहित्य :
1 चमचा ऑर्गेनिक मध
1/2 चमचा हळद पावडर
1/2 चमचा ग्लिसरीन

कसे लावावे ?
1. काचेच्या भांड्यात सगळे साहित्य एकत्र करा.
2. ते चांगले एकत्र करुन पेस्ट तयार करा.
3. पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.
4. ते सुकू द्या.
5. थंड पाण्याने धुवून घ्या.

या पॅकला आठवड्यातून कमीतकमी दोनवेळा लावा. चेहऱ्यावर तुम्हाला फरक दिसून येईल. हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर असते त्याचबरोबर ग्लिसरीन त्वचेला ताजे ठेवते आणि मध त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवते.

मध आणि केळाचा फेसपॅक
साहित्य :

1 चमचा मध
1 चमचा स्मॅश केलेले केळ

कसे लावावे ?
1. मध आणि केळाला चांगल्याप्रकारे एकजीव करा.
2. त्या पेस्टला पुर्ण चेहऱ्यावर लावा.
3. हे चांगले सुकू द्या.
4. नंतर ते थंड पाण्याने धुवून घ्या.

ही पेस्ट आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा लावा.

कसे काम करते हे ?
फेस मास्कमध्ये केळीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. हे फेस पॅक तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवते.