Younger You : नेहमी तरूण दिसायचं आहे, तर वापरून पहा ‘या’ 9 सोप्या टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जीवनात सतत वाढत असलेल्या स्ट्रेसचा थेट परिणाम आपल्या चेहर्‍यावर म्हणजे त्वचेवर दिसून येतो. आपण वयापूर्वीच वृद्ध दिसू लागतो. कपाळापासून, डोळे आणि ओठांपर्यंत वयाच्या खुणा दिसू लागतात. जर तुम्ही सुद्धा या समस्येला तोंड देत असाल तर अस्वस्थ होऊ नका, यावर सहजपणे उपाय करता येतात. नेहमी तरूण दिसायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करा –

1 हातांची विशेष काळजी घ्या
हातांची विशेष काळजी घेण्यासाठी आंघोळ केल्यानंतर किंवा हात धुतल्यानंतर हातांना मॉयश्चराइज करा. वेळोवेळी मॅनीक्युअर सुद्धा करत राहा.

2 आयब्रोजच्या ग्रूमिंग विसरू नका
आयब्रोजचा चांगला शेप चेहर्‍याचा लुक बदलू शकतो. यासाठी योग्यवेळी मेनटेन करा. ट्वीजर किंवा ट्रिमरचा वापर करत असाल तर ते सोडा आणि प्रोफेशनलची मदत घ्या.

3 योग्य ब्यूटी प्रॉडक्टचा वापर
ब्यूटी प्रॉडक्ट खरेदी करताना विचारपूर्वक करा. त्वचेसाठी बेस्ट असलेले प्रॉडक्टच खरेदी करा.

4 फाऊंडेशनचा जास्त वापर नको
हलक्या फाऊंडेशनचा वापर करा. चेहर्‍याला हलका किंवा मीडियम कव्हरेज देणारे फाऊंडेशन घ्या.

5 ब्लशचा वापर करा
चेहर्‍यांचा रंग उजळवण्यासाठी क्रीम ब्लशचा वापर करा. यामुळे चेहरा तरूण दिसेल.

6 गुलाब जलचा वापर करा
गुलाब जल चेहर्‍याला फ्रेश ठेवते. रोज चेहर्‍यावर थोडे गुलाब जल आवश्य लावा.

7 डोळ्यांच्या जवळपासची त्वचा
डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अतिशय नाजूक असते. थकलेल्या डोळ्यांसाठी ओली टी-बॅग काहीवेळ डोळ्यांवर ठेवा. यामुळे आराम मिळेल.

8 योग
हेल्दी चेहर्‍यासाठी फेस योगा करू शकता. यामुळे फेस मसल्स हेल्दी आणि चांगल्या राहतील.

9 ओठांची काळजी
मेकअप नको असेल तरी किमान ओठांना मॉइश्चराइज आवश्य करा.