Home Remedies For Grey Hair : औषधी गुणधर्मांनी समृध्द असलेला आवळा कसा पांढर्‍या केसांना करतो काळे, जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – काळे-दाट सुंदर केस प्रत्येक स्त्रियांना हवे असतात. केसांच्या सौंदर्यासाठी कोणत्याही प्रकारचे घरगुती उपाय करण्यास स्त्रिया अजिबात संकोच करीत नाहीत. जर आपले केस कोरडे, निर्जीव किंवा पांढरे असतील तर आपण आवळा वापरण्यास सुरवात करा. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला आवळा केसांच्या वाढीस मदत करतो.

आवळ्यामुळे टाळू मध्ये ब्लड सर्कुलेशन चांगल्या पद्धतीने होते. तसेच आवळा केसांमध्ये असणारी घाण देखील स्वच्छ करतो. इतकेच नाही तर टाळूशी संबंधित समस्या जसे की खाज सुटणे आणि सूज येणे या समस्या कमी करण्यास देखील मदत होते. आवळा आपल्या केसांना केवळ पौष्टिक घटकच प्रदान करत नाही तर पांढरे केस काळेही करतो. आपल्या केसांसाठी आवळा कसा फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.

आवळ्यामुळे पांढरे केस काळे होतात. वाळलेल्या आवळ्याची पावडर, काळी तीळ, भृंगराज, साखर कँडी समान प्रमाणात घेऊन त्यास मिसळून घ्या. याचा एक-एक चमचा संपूर्ण वर्षभर गरम दुधासह प्या. असे केल्याने केस काळे, दाट मजबूत होतील.

दोन चमचे चूर्ण केलेला आवळा आणि तुळशीच्या 40 पानांचे चूर्ण मिक्स करावे. त्यांना एक कप पाण्यात मिसळून घ्यावे. या मिश्रणाला केसांच्या मुळांवर लावावे आणि कोरडे झाल्यावर डोके धुवावे. असे केल्याने अकाली पांढरे झालेले केस काळे होतात आणि नंतरही पांढरे केस येत नाहीत.

केस लांब करण्यासाठी वाळलेला आवळा आणि मेहंदी दोन्ही समान प्रमाणात अर्धा कप पाण्यात भिजवा. आवश्यकतेनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. जर आपण या मिश्रणाने केस धुतले तर केस मऊ आणि लांब होण्यास मदत होईल.

एक चमचा चहा एक कप पाण्यात टाकून उकळवा. चांगल्या पद्धतीने उकळल्यावर त्यास गाळून घ्या. यामध्ये दोन चमचे आवळ्याचे चूर्ण, चार चमचे मेहंदी, अर्धा चमचा कॉफी टाकून त्यास मिसळा आणि केसांवर त्याचा लेप लावा. एका तासानंतर डोके धुवा. यामुळे केस अधिक काळे होतील आणि पांढरे केस काळे होऊन चमकायला लागतील. आठवड्यातून एक किंवा दोनदा याचा वापर करा. आवश्यकतेनुसार मात्रा वाढवू शकता.

केसांना नैसर्गिक तेल न लावल्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात, म्हणून केसांना आवळ्याचे तेल लावा.

आवळ्यामुळे केस दाट होतात. त्यासाठी आवळ्याच्या पावडरमध्ये तुळशीची पाने आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा आणि त्यास केसांच्या मुळांवर लावा. वीस मिनिटांनंतर आपले डोके धुवा. काही महिन्यांपर्यंत असे केल्याने केस मऊ, काळे, दाट होतात आणि केस गळणे देखील थांबतात.

आवळा शैम्पू म्हणूनही काम करतो. त्यासाठी शिकाकाई आणि आवळा पूड मिक्स करावी. रात्री अर्धा लिटर पाण्यात आठ चमचे पावडर भिजवा. सकाळी त्यांना चांगले हलवा आणि फिल्टर करून केसांमध्ये चोळा आणि दहा मिनिटांनंतर आपले डोके धुवा. हा एक नैसर्गिक शैम्पू आहे. यामुळे तेलकट केस देखील चमकदार आणि मऊ होतात.