Hair Fall In Monsoon : पावसाळ्यात उद्भवते ‘केस गळती’ची समस्या, ‘या’ 5 घरगुती उपायांचा करावा अवलंब, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजकाल केस गळतीची समस्या सामान्य झाली आहे. जगातील बर्‍याच स्त्रिया या समस्येशी झगडत आहेत. यासह, पावसाळा आला की ही समस्या आणखी वाढते. पावसाळ्याच्या दिवसात दमटपणामुळे केस अधिक गळू लागतात. याव्यतिरिक्त पावसाळ्यात असे अनेक जंतू देखील पसरतात, ज्यामुळे संसर्ग होतो. कोरोना विषाणू साथीचा आजार सगळीकडे पसरत आहे आणि त्यामुळे ताणतणावही वाढत आहे. ताणतणाव देखील केस गळण्याचे कारण आहे.

पावसाळ्यात अधिक केस का गळतात

पावसाळ्यात हवामान गरम होण्यासह ते दमटही बनते. हवेतील ओलावा केस कोरडे व तेलकट बनवतात. यामुळे लोक आपले केस अधिक धुतात. रसायनांनी समृद्ध शैम्पूमुळे आपल्या केसांना अधिक नुकसान होते आणि केस गळण्यास सुरवात होते. तज्ज्ञांच्या मते, जेथे सामान्य हंगामात 50 केस पडतात तेथे पावसाळ्यात 150 टक्के अधिक केस गळू शकतात.

या 5 मार्गांनी पावसाळ्यात देखील राहतील सुंदर केस

तथापि, जास्त केस गळण्याची समस्या फक्त या हंगामातच असते. हवामानातील बदलासह ही समस्या आपोआप ठीक होते. परंतु जर आपण केस गळतीमुळे त्रस्त असाल तर आपण हे 5 घरगुती उपचार करू शकतात.

1. तेलाने करा मालिश

केसांच्या मुळापासून तळाशी तेल चांगले लावा. केसांमध्ये तेलाची मालिश करणे आवश्यक असते, कारण यामुळे आपल्या केसांना कंडिशनिंग मिळते. तसेच तेलात असलेले पोषण आपले केस निरोगी बनवतात. तसेच यामुळे केस अधिक मजबूत होतात आणि कमी गळतात.

2. स्टाईलिंग साधनांचा वापर करू नये

या हंगामात शक्य तितके स्टाइलिंग साधने वापरू नका. स्ट्रेटनर, हेअर कर्लर सारख्या गोष्टी केसांना नुकसान पोहोचवतात. म्हणून अशा हवामानात केस धुतल्यानंतर ओल्या केसांनाच विंचरावे जेणेकरून त्यांची गुंतागुंत होणार नाही.

3. अन्नात प्रथिनांचा समावेश करा

आपले केस आणि नखे केराटीन नावाच्या प्रथिनांपासून बनतात. जर आपले केस जास्त प्रमाणात गळत असतील तर त्यामागे प्रथिनांची कमतरता असू शकते. म्हणून आपल्या आहारात डाळी, शेंगवार्गीय भाज्या, अंडी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. ते आपल्या केसांना मजबुती देतील.

4. हेअर मास्क लावा

अतिरिक्त केसांची निगा राखण्यासाठी आपण हेअर मास्क वापरू शकता. शैम्पू आणि कंडिशनरने केस धुण्यापूर्वी हेअर मास्क वापरा. यासाठी अंडी, केळी, दही वापरता येईल.

5. टॉवेलने केस कोरडे करू नये

टॉवेलपेक्षा टी-शर्टच्या सहाय्याने केस कोरडे करावेत. टॉवेलने केस फ्रिझी होतात आणि गळू लागतात. यासाठी तुम्ही कॉटनचा टी-शर्ट वापरू शकतात.

(Disclaimer: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. आपल्याला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)