Coconut Oil Skin Benefits : उन्हाळ्यात त्वचेला मॉयश्चराईज करतो खोबरेल तेलाचा मास्क, जाणून घ्या बनवण्याची कृती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खोबरेल तेल मुरूमाची समस्या दूर करते, सोबतच कोरड्या त्वचेला मॉयश्चराईज करण्याचे सुद्धा काम करते. असंख्य फायदे असणार्‍या या तेलाचा फेस मास्क बनवून चेहर्‍यावर लावला तर चेहरा प्रत्येक हंगामात तजेलदार आणि कोमल दिसेल. घरात खोबरेल तेलाचा मास्क कसा तयार करायचा ते जाणून घेवूयात.

1. खोबरेल तेल आणि एलोवेरा फेस पॅक :
खोबरेल तेल आणि एलोवेराचा त्वचेवर कुलिंग प्रभाव होतो. हा जीवाणूंना मारतो, पेशींची संख्या वाढवतो आणि डाग हटवतो.

साहित्य
एक चमचा खोबरेल तेल
एक चमचा एलोवेरा जेल

असे वापरा
खोबरेल तेल आणि एलोवेरा एकत्र करून चेहर्‍यावर लावा. चेहर्‍यावर ही पेस्ट लावून हलका मसाज करा आणि 10-15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

2. खोबरेल तेल आणि मधाचा पॅक :
खोबरेल तेल, मध आणि शिया बटर त्वचेला ओलावा प्रदान करते आणि त्वचेची छिद्रे उघडते. खोबरेल तेल आणि मधात सूक्ष्मजीवविरोधी आणि बुरशी रोधक गुण असतात जे किटाणूला मरतात आणि त्वचा तंदुरुस्त ठेवतात.

साहित्य
-एक चमचा खोबरेल तेल
-एक चमचा कच्चे मध
-एक कप शिया बटर

कृती :
* एक बाऊल घेऊन त्यामध्ये खोबरेल तेल आणि शिया बटर मिसळा आणि ते वितळवा.
* आचेवरून बाजूला करून त्यामध्ये मध टाका.
* चांगले मिसळून नंतर चेहर्‍यावर लावा.
* हे अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवून टाका.