Coffee Benefits For Hair : केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी लावा कॉफीचा मास्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  केस आपले पूर्ण व्यक्तिमत्व सुधारतात. महिला असो किंवा पुरुष केस प्रत्येकासाठी खूप महत्वाचे असतात. केस बळकट करण्यासाठी आणि त्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण हेअर स्पा, हेअर मास्क किंवा इतर महागडे उपचार करतो, जेणेकरून केस सुंदर आणि मजबूत राहतील. मात्र या सर्व उपचारांचा कधीकधी आपल्या केसांवर नकारात्मक परिणामही होतो. केस कमकुवत आणि निर्जीव होऊ लागतात.

तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या उपचाराने कंटाळले असाल, तर केसांवर काही घरगुती उपचार करून पहा. केसांच्या वाढीसाठी केसांवर कॉफी मास्क लावा. कॉफीमध्ये कॅफिन असते, जे केसांना अधिक मजबूत आणि लांब बनवण्यास मदत करते. कॅफिन ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि केसांच्या फॉलिसेल्सला बूस्ट करते, ज्यामुळे केसांची वाढ होते. नियमितपणे कॉफी वापरल्याने केसांचे फॉलिसेल्स मजबूत होतात, ज्यामुळे केस मऊ, लांब आणि जाड होतात. जर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांवर कॉफीचा मास्क लावला, तर तुम्हाला फरक दिसून येईल. तुम्ही घरी कॉफी मास्क कसा वापरू शकता, ते जाणून घेऊया…

साहित्य
२ चमचे ग्राउंड कॉफी
१ कप पाणी

केसांवर मास्क कसा लावायचा?
केसांवर मास्क लावण्यासाठी सर्वप्रथम स्ट्रॉंग कॉफी तयार करा आणि ती थंड होऊ द्या.
केसांवर मास्क लावण्यापूर्वी केसांना शाम्पू लावा आणि केस कोरडे करा.
आता कॉफीचा मास्क लावण्यासाठी केसांवर स्कॅल्पपासून कोल्ड कॉफी लावा.
जेव्हा कॉफी सर्व केसांवर लावून होईल तेव्हा केसांना ५ मिनिटांसाठी मसाज करा आणि शॉवर कॅपने केस झाकून टाका.
कॉफीला अर्धा तास केसांवर राहू द्या. अर्ध्या तासानंतर केस चांगले धुवा.