रात्री लावा ‘हे’ Face Pack आणि सकाळी पाहा ‘गोरी’ आणि ‘तजेलदार’ त्वचा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चेहरा हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो त्यामुळे त्याचं सौंदर्य राखायला अत्यंत महत्त्व आहे. नोकरी करणाऱ्या महिला दिवसभर मेकअप आणि फाउंडेशन वापरून त्वचेची काळजी घेतात. घरी आल्यावर मेकअप उतरवल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेला नाहीसा होतो. काही घरगुती उपाय केले तर दिवसभर महिलांची त्वचा चमकदार राहू शकते.

1)  चेहऱ्यावरील त्वचेची छिद्र मोकळी होऊन त्वचा मलूल दिसत असेल तर ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबपाणी एकत्र करून ते मिश्रण चेहरा आणि गळ्यावर समप्रमाणात लावा. 10 मिनिटं तिथं मसाज करा. अंदाजे 20 मिनिटांनी थंड पाण्यानी चेहारा व गळा धुवून टाका, चेहऱ्यावर झळाळी येईल.

2)  चेहऱ्यावर डेड स्कीन दिसत असेल तर गुलाब पाण्यानी चेहरा थोडासा ओला करून घ्या त्यानंतर ओटमिलने स्क्रब करून घ्या. चेहरा धुतल्यानंतर काकडीच्या पातळ चकत्यांनी संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा.

3)  मिल्क क्रीम आणि गुलाबपाण्याची एक पेस्ट तयार करून घ्या. त्याच पेस्टनी आपल्या चेहऱ्यावर पाच मिनिटं मसाज करा, त्यानंतर पाच मिनिटं त्याला तसंच राहू द्या. नंतर थोड्या कोमट पाण्यानी चेहरा धुवा. पॅकचा वापर केलात तर तुमची त्वचा दिवसभर चमकदार तजेलदार दिसेल.

4)  चेहऱ्याची त्वचा मृदु मुलायम होण्यासाठी व्हिटामिन ईच्या एका कॅप्सुलमध्ये अर्धा चमचा कोरफडीचे जेल (अलोव्हेरा जेल) टाकून त्यानी दोन मिनिटं मसाज करावा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे चेहऱ्याला लावा. जर तुम्हाला हे मिश्रण चिकट वाटलं तर ते तुम्ही दिवसाही लावू शकता.

5)  अंड्यातील पिवळं बलक आणि कवचाचं मिश्रण एकत्र फेटून चेहरा आणि मानेवर लावा. चेहरा वाळल्यानंतर कोमट पाण्यानी तो धुवून टाका. यामुळे त्वचा तजेलदार तर होईलच पण चेहऱ्यावरची त्वचा सैल पडणार नाही.