Eye Makeup With Mask : मास्कसोबत वाढेल डोळ्यांचे सौंदर्य, ‘या’ 4 स्टेपनं करा मेकअप

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसपासून वाचायचे असेल तर तोंडावर मास्क घालावाच लागेल. मास्क एकीकडे तुम्हाला कोरोनापासून वाचवत आहे, तर दुसरीकडे चेहर्‍याचे सौंदर्य हिसकावत आहे. मास्क लावल्यानंतर संपूर्ण चेहरा झाकला जातो, परंतु डोळे खुले राहतात, सध्या हे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. वर्क प्लेस किंवा मार्केटमध्ये शॉपिंगसाठी जाता तेव्हा लोकांचे सर्व लक्ष डोळ्यांवर असते. तुम्हाला सुद्धा तुमचे डोळे सुंदर करायचे असतील तर कोरोना काळात डोळ्यांचा मेकअप कसा करायचा ते जाणून घेवूयात…

1 सर्वप्रथम डोळ्यांवर लावा कन्सीलर
जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर सर्वप्रथम कन्सीलर लावा, यामुळे काळपटपणा झाकला जाईल. कन्सीलर डोळ्यांच्या खाली लावा आणि त्यावर पावडरचा वापर करा.

2 आयशॅडो किंवा आयलायनरचा वापर करा
नेहमी लोक डोळ्यांचा मेकअप करताना प्रथम काजळ वापरतात. नंतर आयशॅडो किंवा आयलायनर वापरतात. योग्य पद्धती ही आहे की, प्रथम आयलायनरचा बसे तयार करा, नंतर आयलायनरचा वापर करा.

3 मास्कराचा वापर करा
डोळ्यांवर आयलायनर लावल्यानंतर मस्कारा वापरा. प्रथम मस्काराचा कोट बाहेरच्या बाजूला लावा नंतर आतमध्ये लावा.

4 शेवटी लावा काजळ
डोळ्यांचा मेकअप करताना शवेटची स्टेप काजळ आहे. डोळ्यांवर काजळ लावताना काळजीपूर्वक लावा. काजळ पसरणार नाही याची काळजी घ्या. काजळ लावल्यानंतर ब्रशच्या मदतीने खुप कमी प्रमाणात शिमर घेऊन ब्रशने एक कोट लावा.