आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर कलिंगड, जाणून घ्या या थंड फळाचे 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – उन्हाळा सुरु होताच बाजारात फळांचा राजा आंबा आणि नंतर कलिगंडाची मागणी वाढते. ही दोन अशी फळे आहेत, जी तीव्र उष्णतेत तुमचा मूड चांगला करू शकतात. आज आपण कलिंगडाचे फायदे जाणून घेणार आहोत. आरोग्य आणि त्वचेच्या बाबतीत कलिगंडाचे बरेच फायदे आहेत. लाल रंगाच्या रसाळ कलिगंडात पुरेशा प्रमाणात पाणी असते. कलिंगड खाल्ल्याने उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नाही आणि बॉडी हायड्रेटेड राहते. याव्यतिरिक्त कलिंगडात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतात. तसेच त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक घटक देखील असतात.

जाणून घेऊया थंड कलिंगडाचे फायदे…
त्वचेसाठी कलिंगड फेस पॅक
जर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर कलिगंडाचा छोटा काप घेऊन त्याला मॅश करा आणि नंतर त्यात दही घालून चांगले मिक्स करून पेस्ट बनवा. आता हा पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि १०-१५ मिनिटांनंतर एखादे चांगले क्लींजर लावा.

नॅचरल टोनर
कलिंगडाचा रस नॅचरल टोनर सारखे देखील काम करतो. यात हलक्या प्रमाणात आढळणारे ऍसिडिक गुणधर्म तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या टोन करतात.

ऑइल फ्री स्किन
कलिंगडात आढळणारे व्हिटॅमिन ‘ए’ चे प्रमाण त्वचेच्या छिद्रांचा आकार कमी करते, ज्यामुळे एजिंग त्वचेमध्ये तयार होणाऱ्या तेलाची समस्या देखील दूर होते. कलिंगडाचा पल्प चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटानंतर धुवा.

पिंपल्सपासून सुटका
कलिंगडाच्या रसाने रोज चेहऱ्याला मसाज करा, यामुळे ऍक्ने आणि पिंपल्स दूर होऊ शकतात.

सुरकुत्यांपासून सुटका
एका छोट्या भांड्यात एक चमचा कलिंगडाचा रस आणि एक मोठा मॅश केलेला ऍव्होकॅडो घ्या. ते चांगले मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावा. १५-२० मिनिटांनंतर ते थंड पाण्याने धुवा आणि हलक्या हातांनी स्वच्छ टॉवेलने पुसा.

You might also like