Hair Wash Tips : जाणून घ्या केसांना किती वेळा ‘शॅम्पू’ करणं योग्य !

पोलीसनामा ऑनलाईन : आधुनिक काळात केस गळणे, लठ्ठपणा आणि मधुमेह या सामान्य समस्या बनल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे चुकीचे खानपान, खराब जीवनशैली आणि तणाव हे आहे. वाढत्या वयात केसांची समस्या सामान्य आहे, परंतु अगदी लहान वयातच केस गळणे आणि पिकणे ही चिंतेची बाब आहे. तज्ञांच्या मते शरीरात व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेमुळे केस गळण्याचा त्रास होतो.

तसेच जास्त शैम्पू केल्याने देखील केस गळतात. यासाठी आपण प्रथम आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे. आपल्या आहारात व्हिटॅमिन-सी समृध्द फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. आपण देखील केसांच्या समस्येमुळे त्रस्त असाल आणि शैम्पू वापरत असाल तर आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करणे योग्य आहे त्याबाबत जाणून घेऊया.

आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करणे आवश्यक आहे

शॅम्पूबद्दल लोकांमध्ये मतभेद आहेत. काही लोक म्हणतात की जास्त केस धुतल्याने केस कमकुवत होतात. यामुळे केस लवकरच तुटू लागतात आणि गळतात. काहीजण असे म्हणतात की आठवड्यातून तीन वेळा केसांना शॅम्पू करणे योग्य आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की जर आपले केस लहान असतील तर आपण आठवड्यातून दोन वेळा शॅम्पू करावा. केस मोठे असल्यास तीन वेळा शॅम्पू करणे योग्य आहे. कारण मोठ्या केसांना अधिक मॉइस्चरायझिंग आणि काळजी घेण्याची आवश्यकता असते.

जर केस कोरडे आणि निर्जीव असल्यास आपण आठवड्यातून तीन वेळा नियमित शॅम्पू आणि कंडिशनिंग करू शकता. तथापि आउटडोअर जॉब करणार्‍या लोकांचे केस धूळ आणि मातीमुळे पटकन खराब होतात. अशा लोकांना एका दिवसाआड शॅम्पू वापरणे योग्य असते. एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच वेळी जास्त शॅम्पू वापरू नये. तथापि, वेगवेगळ्या प्रकारच्या केसांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते.