जर आपल्याला त्वचेवरील प्रदूषणाचा परिणाम कमी करायचा असेल, तर मसूर डाळीचा पॅक लावा, जाणून घ्या इतरही फायदे

पोलीसनामा ऑनलाइन : आपल्या त्वचेच्या सौंदर्याचा खजिना आपल्या स्वयंपाकघरातच लपलेला आहे. किचनमधील असलेल्या रेमिडीज आपल्या त्वचेवर उपचार करू शकतात. स्वयंपाकघरातील मसूर डाळ खायलाच चवदार नसते तर प्रदूषणापासून बचाव करून तुमची त्वचा सुंदर बनवते. आपण आपल्या चेहऱ्यावर चमक आणू इच्छित असल्यास किंवा मुरमांपासून मुक्त होऊ इच्छित असल्यास मसूरच्या मास्कचा वापर करा. मसूर डाळीमध्ये बरीच खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट असतात, जे त्वचेसाठी अतिशय सुरक्षित असतात. जाणून घेऊया आपली त्वचा उजळ करण्यासाठी मसूर डाळीच्या मास्कचा कसा वापर करू शकता.

मसूर डाळचा असा करा वापर:
– जर आपला चेहरा उजळ करायचा असेल तर मसूर डाळीची पेस्ट बनवा आणि त्यात हरभरा पीठ आणि मुलतानी माती मिसळा, हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. जेव्हा ते चेहऱ्यावर कोरडे झाल्यावर तेव्हा चेहरा धुवा. हे आपल्या चेहऱ्यावर चमक आणेल.

– मसूरच्या डाळीमध्ये दूध आणि अंड्याचा पांढरा भाग मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. हे पेस्ट लावल्यास त्वचेच्या सर्व समस्या दूर होतील.

– मसूरचा डाळीचा पॅक वृद्धत्व दिसण्यापासून प्रतिबंधित करते. मसूरच्या डाळीत अँटी-एजिंग गुणधर्म असतात. मसूर डाळीत अक्रोड पावडर घाला आणि चांगले मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. या पेस्टमुळे चेहऱ्यावरील बर्न्स तसेच चेहऱ्यावरील टॅन काढून टाकण्यास मदत होईल.

– मसूर डाळ त्वचेच्या स्वच्छतेसाठी सर्वोत्तम आहे. त्वचेवरील प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी ही डाळ खूप फायदेशीर आहे. जर आपली त्वचा ऑईली असेल तर आपण मसूर डाळीच्या पावडरमध्ये दूध मिसळून याचा वापर करू शकता. या पेस्टमुळे चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकते, तसेच दूध चेहऱ्याला मॉइस्चराइझ करते. आठवड्यातून एकदा याचा वापर करा.

– जर तुमची त्वचा कोरडी असेल तर डाळीच्या पावडरमध्ये मध घालून चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट काही काळ चेहऱ्यावर लावा आणि मग चेहरा धुवा.

– जर तुमची तेलकट त्वचा असेल तर डाळीच्या पावडरमध्ये व्हाईट व्हिनेगरचे काही थेंब घाला आणि चेहऱ्यावर लावा, त्यामुळे चेहऱ्याचा ऑइलीपणा नियंत्रणात राहील.

– सामान्य त्वचेचे लोक मसूर डाळीच्या पावडरमध्ये दही आणि व्हाईट व्हिनेगर डाळीच्या पावडरमध्ये मिसळतात आणि ते चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यावर चेहरा धुवा, आपण व्हाईट व्हिनेगरऐवजी लिंबाचा रसदेखील वापरू शकता.