‘या’ सुंदर साडीमध्ये राजकुमारी दिसतेय नोरा फतेही, इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड डान्सर क्वीन नोरा फतेही जी तिच्या डान्सने कोणालाही थिरकायला भाग पाडू शकते. तिचा डान्स आणि लवचिक शरीर कोणालाही वेडं करू शकते. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही एक मोरोक्कियन कॅनेडियन डान्सर, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. नुकताच अभिनेत्रीने भारतीय स्टाईलची साडी परिधान करून आपला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. नोरा सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या डान्स रिॲलिटी शोची जज आहे. शोसाठी फ्लॉवर साडी घालून नोराने तिच्या लूकने लोकांना हैराण केले आहे.

नोराने पहिल्यांदाच तिच्या चाहत्यांसह साडीचा फोटो शेअर केला ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली ही साडी एका ऑफ-व्हाइट ऑर्गेना साडीमध्ये क्लासिक सब्या फ्लॉवर प्रिंटसोबत पिवळ्या, फिकट गुलाबी आणि हिरव्या रंगासोबत मिसळून गोटा पट्टी बाउडरसह बनवली गेली आहे.

सब्यसाची एक डिझाइनर आहे, ज्यांना सुंदर सिक्स यार्ड ड्रेस डिझाइन करण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांनी ही सूंदर साडी डिजाइन करून हे सिद्ध केले की, साडी डिझाईन करण्यातही त्यांना तोड नाही.

साडीबरोबरच नोराने गुलाबी रंगाचा मोत्याचा हार आणि मॅचिंग इयर रिंगही घातल्या आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मॉडर्न टाईममध्ये नोराच्या साडी लूकने सर्वांनाच चकित केले.