फक्त ‘पपई’ नव्हे तर तिचे सालं देखील फायद्याचे, चेहर्‍यावरील सौंदर्यासह ‘अकाली’ वृध्दत्वाला थांबविण्यासाठी अत्यंत उपयोगी

पोलीसनामा ऑनलाईन : उपवासाच्या दिवसांत बर्‍याच स्त्रिया आपल्या आहारात फळांचा जास्त समावेश करतात. दरम्यान उपवासाच्या वेळी जेव्हा आपण पपई आणता तेव्हा तिचे साल टाकून देऊ नका. कारण सौंदर्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पपईमध्ये आढळणारे पपाइन नावाचे एन्झाईम्स शरीरात केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर सौंदर्य सुधारण्यासही मदत करतात.

मृत त्वचा दूर करते
पपईची साल आपल्या चेहऱ्यावर घासून हलके हातांनी हळू मालिश करा. यामुळे त्वचेतील मृत पेशी सहजपणे काढून टाकल्या जातील आणि त्वचा चमकदार होईल. यामुळे त्वचेचे छिद्रही चांगले उघडतात. यामुळे त्वचेला मुक्तपणे श्वास घेता येतो. परिणामी, चेहरा चमकतो.

चेहऱ्यावर चमक आणा
पपईची साल बारीक चिरून घ्या आणि त्यामध्ये थोडा पपईचा लगदा घाला. याचा वापर फेस पॅक म्हणून करता येतो. कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने धुवा. पपई फेसपॅकचा काही दिवस सतत वापर केल्यास चेहरा सुधारू शकतो. म्हणून, पुढच्या वेळी पपई कापताना कचरा म्हणून टाकण्याऐवजी त्याचा वापर सौंदर्यासाठी करता येईल.

नको असलेल्या केसांची वाढ होणार कमी
पपईमध्ये आढळणारे पपाइन एंजाइम नको असलेल्या केसची वाढ कमी करते. जर आपल्याला चेहऱ्यावरील केसांपासून सुटकारा हवा असेल तर पपईची साल किंवा लगदा दोघांचा वापर करा.

वाढत्या वयाचे परिणाम थांबविण्यास प्रभावी
त्वचेला दुरुस्ती करण्यासोबतच, पपई हायड्रेट आणि एक्सफोलिएट करण्याचे देखील कार्य करते. पेपेन एन्झाइम चेहऱ्यावरील रिंकल्सला कमी करून अकाली वृद्धत्वाचा प्रभाव देखील कमी करते.

भाजलेले किंवा कापलेले निशाण दूर करण्यास मदत
पपई भाजलेले किंवा कापलेले निशाण चट्टे देखील बरे करते. बाधित भागावर ताज्या पपईचा लगदा लावा आणि थोडावेळ ठेवा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like