‘या’ 3 पध्दतीनं होळीनंतर पुन्हा केसांना ‘सुंदर’ आणि ‘चमकदार’ बनवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्ही देखील या वेळेस होळीच्या रंगात रंगले असाल, तर आता वेळ आली आहे की वेगवेळ्या रंगांनी खराब झालेल्या आपल्या केसांना स्वच्छ करण्याची. होळीचे रंग केसांवरून लवकर जात नसतात. जेव्हा होळी खेळल्यानंतर तुम्ही केस धुता, त्यानंतर केस हे खूप कोरडे आणि निर्जीव होतात.

जर तुम्हीही होळीनंतर तुमच्या कोरड्या आणि निर्जीव केसांबाबत अस्वस्थ असाल तर आम्ही आपल्यासाठी एक सोपा उपाय घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला अशाच तीन आश्चर्यकारक हेअर पॅक्सबद्दल सांगत आहोत जे की तुमच्या केसांना पुन्हा सुंदर बनवतील आणि बर्‍याच सामान्य समस्या देखील दूर करतील.

१) नाजूक केसांसाठी कोरफड, अ‍ॅपल साइडर व्हिनेगर आणि मध-
जर आपले स्कॅल्प नाजूक असेल तर कोरफड पेक्षा दुसरा कोणताही उत्तम पर्याय नाही. कोरफड केसांना लावल्याने केस मजबूत होतात. यासाठी तुम्ही कोरफडच्या जेलमध्ये अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि काही थेंब मध मिसळावे. हे मिश्रण केसांना लावून ते १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा

२) कोरड्या केसांसाठी खोबऱ्याचे तेल- 
जर आपले केस कुरळे, कोरडे आणि खराब असतील तर खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. यासाठी तुम्ही केवळ ऑरगॅनिक आणि व्हर्जिन तेलाचा वापर करा. तेलास हलके गरम करून मालिश करत केसांत लावा आणि एक किंवा दोन तास तसेच राहू द्या. यानंतर कोमट पाणी, शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवा.

३) फ्रिजी केसांसाठी मध आणि केळी-
या हेअर पॅकला घरी देखील बनवणे खूप सोपे आहे. यासाठी आपल्याला एक केळी स्मॅश करून त्यात मध चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यावे लागेल. यानंतर हे मिश्रण केसांना योग्यरीत्या लावा. ३० मिनिटे ठेवल्यानंतर केसांना कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने आपले केस अजिबात फ्रिजी दिसणार नाहीत.