Winters Beauty Tips : जास्त प्रमाणात उन्हात बसल्याने त्वचेवर येऊ शकते टॅनिंग, ‘या’ पध्दतीनं होईल बचाव, जाऊन घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसायला खूप चांगले वाटते. सूर्यप्रकाश आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु जास्त सूर्यप्रकाश त्वचेसाठी हानिकारक आहे. जर आपण हिवाळ्यात जास्त वेळ उन्हात राहिल्यास आपल्या त्वचेवर टॅनिंग येते. सूर्यामुळे त्वचा कोरडी व काळी दिसते. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होते. हिवाळ्यात अर्ध्या तासासाठी कोवळ्या उन्हात बसणे फायद्याचे आहे, परंतु जास्त वेळ उन्हात बसल्यास त्वचेवर टॅनिंग येते. याव्यतिरिक्त, सूर्य बर्न, सुरकुत्या आणि डोळ्यांच्या पडदयाचे देखील नुकसान होऊ शकते. जर आपल्याला त्वचेवरील टॅन काढायचा असेल तर हे घरगुती उपचार करून पहा.

नारळाच्या तेलाने टॅन काढा:

हिवाळ्यात, उन्हात जाण्यापूर्वी नारळाचे तेल आपल्या हात आणि पायांना लावा. यामुळे त्वचेवर टॅनचा प्रभाव दिसून येणार नाही.

कोको बटरचा करा वापरः

सनटॅन टाळण्यासाठी आपण कोको बटर वापरू शकता. अर्धा चमचा किसलेले कोको बटर आणि एक चमचा नारळाच्या तेलात गुलाब पाणी मिसळा. उन्हात जाण्यापूर्वी हे मिश्रण लोशन म्हणून लावा.

होम मेड सनस्क्रीन बनवून वापरा:

बाजारात असलेल्या सनस्क्रीनमध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. टॅनिंग काढण्यासाठी घरगुती सनस्क्रीन वापरा.

नैसर्गिक सनस्क्रीन बनविण्यासाठी एका लहान बाउल मध्ये कोरफड जेल घ्या. त्यात 1 चमचा नारळाचे तेल घालून मिक्स करा. आता त्यात 10-15 थेंब पेपरमिंट तेल घाला. तयार सनस्क्रीन एका टाइट कंटेनरमध्ये ठेवा.