Orange Peels Benefits : हिवाळ्यात संत्र्याच्या सालीने करा स्किनचा उपचार, उजळलेली दिसेल त्वचा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चेहर्‍याचे सौंदर्य कायम राखण्यासाठी आपण महागडे प्रॉडक्ट खरेदी करतो, विविध प्रकारच्या ट्रीटमेंट करतो, जेणेकरून चेहरा नेहमी सूंदर दिसावा. पण, अनेकदा पदरी निराशाच येते. यासाठी नैसर्गिक उपचार करा. चेहर्‍याचे सौंदर्य वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. संत्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. संत्र्याच्या सालीत पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते, जे स्किनच्या समस्येवर लाभदायक ठरते. संत्र्याच्या सालीचा वापर कसा करावा ते जाणून घेवूयात…

कशी करावी संत्र्याची पावडर
जर तुम्ही घरात संत्र्याच्या सालीची पावडर बनवणार असाल तर संत्र्याची साल सुखवा. सुखल्यानंतर ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

1 त्वचा उजळवण्यासाठी पॅक
या पावडरचा पॅक बनवण्यासाठी एक चमचा संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये दोन मोठे चमचे हळद पावडर मिसळा. या पेस्टमध्ये गुलाबजल सुद्धा मिसळून घ्या. सर्व एकत्र करून घ्या. तुमचा फेसपॅक तयार झाला आहे. आता चेहर्‍यावर लावण्यासाठी चेहरा स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. ही पेस्ट चेहर्‍यावर 15 मिनिटे ठेवा, आणि धुवून टाका. या पॅकने चेहरा उजळेल.

2 त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी संत्रे आणि दूधाचा पॅक
जर चेहर्‍यावर कोरडेपणा जास्त असेल तर तुम्ही संत्रे आणि दुधाचा पॅक लावा. हा पॅक तयार करण्यासाठी एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. किमान 15 मिनिटे चेहर्‍यावर राहू द्या, नंतर चेहरा सुखल्यावर वॉश करून घ्या. आठवड्यात दोन वेळा या पॅकचा वापर करा. यामुळे त्वचेचा कोरडेपण दूर हाऊन त्वचा उजळ होईल.