Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान घ्या तुमच्या त्वचेची आणि केसांची ‘अशी’ काळजी, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   ही अशी वेळ आहे, ज्यावेळी असे कोणतेही ठिकाण नाही जिथे आपण सुरक्षित असू. कोरोनामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन आहे. लोक बंद घरात बसलेले आहेत आणि प्राणी रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनामुळे जीवन अगदी उलटे झाले आहे. परंतु आपण घरात असलो तरी स्वत:ची काळजी घेण्याची आपली जबाबदारी आहे.

घरात राहणं सोपं तर नाही परंतु कोरोनाला रोखणं आपल्या पुढील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे स्वताची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही सुरुवात होते आपल्या शरीराची त्वचा आणि केसांपासून.

हे सर्वांना माहिती आहे की त्वचा आणि केसांची काळजी न घेतल्यास ते खराब होतात. घरातून बाहेर पडलो की शरीरात ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे मेटाबॉलिजम चांगले होते परंतु घरी बसून शरीर सुस्त होतं ज्याचा थेट परिणाम त्वचा आणि केसांवर होतो.

जर तुम्हाला वाटत असेल की शारीरिक कार्य कमी झाल्याने त्याचा परिणाम मेटाबॉलिजमवर होतो तर पायऱ्या चढा किंवा उतरा. कमीत कमी 10 – 15 पायऱ्या वर-खाली करा. येथे तुमच्या शरीराचे चांगले वर्कआऊट होईल. जर तुम्हाला डॉन्स करणं आवडत असेल तर अर्धातास तरी तुमच्या आवडत्या गाण्यावर डॉन्स करा. याचा चांगला परिणाम ना की फक्त तुमच्या केसांंवर होईल तर त्वचेवर देखील होईल.

पॅक आणि प्रोसेसिंग केलेले फूड त्वचेसाठी चांगले नाही. यामुळे शारीरिक कार्यावर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो, यावेळी तुम्ही नारळ पाणी आणि ज्यूस प्यावे, याशिवाय ताजी फळ आणि भाज्या खाव्यात.

त्वचेसाठी नैसर्गिक वस्तुंचा वापर करा –

लॉकडाऊन वेळी घरात असताना तुमच्यासाठी हे चांगले असेल की कॉस्मेटिक्स ऐवजी नैसर्गिक वस्तूंचा वापर करा. यासाठी तुम्हाला एक टॉमेटो आणि बटाटा घेण्याची आवश्यकता आहे. हे धुवा आणि मिस्करमध्ये बारीक करा. त्यानंतर हे आईस ट्रेमध्ये टाका. जेव्हा तुम्ही सकाळी आपले काम सुरु कराल तेव्हा एक आईस क्यूब तुमच्या चेहऱ्यावर लावून मसाज करा. तुमची त्वचा चमकेल.

डेड स्कीनचा उपचार असा करा –

एक छोटा चमचा बेस आणि अर्धा चमचा गव्हाचे जाडेभरडे पीठ मिसळून त्याने मसाज करा. तुमची त्वचा एकदम फुलेल. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर या मिश्रणात गुलाब जल टाकून ते चेहऱ्याला लावा. जर त्वचा साधारण असेल तर मिश्रणात दही मिसळा आणि ते चेहऱ्याला लावा आणि त्वचा कोरडी असेल तर त्यात मोहरीचे तेल मिसळून ते लावून चेहऱ्याची मसाज करा.

हे पॅक तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी शरीराला लावू शकतात. यामुळे ना की फक्त तुमचा रक्त प्रवाह सुधारेल तर डेड स्कीन देखील निघून जाईल.