तेलकट त्वचेच्या काळजीसाठी उपयुक्त ‘हे’ 4 ऑईल्स, जाणून घ्या कसा करायचा त्यांचा वापर

पोलीसनामा ऑनलाइन – तेलकट त्वचेची काळजी तेही तेलाने ऐकून थोडे विचित्र वाटेल. पण तुम्ही अशी उत्पादने वापरू शकता जी विशेषत: या त्वचेच्या प्रकारासाठी आहेत. तुम्ही वापरु शकता असे अनेक फेस ऑइल्स आहेत, ज्यामुळे तुमचा चेहरा तेलकट होणार नाही. या तेलांच्या वापरामुळे तुम्हाला मुरुमांसह स्वच्छ, ग्लोइंग त्वचा यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. फक्त ते योग्यप्रकारे वापरले पाहिजेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात बहुतेक स्त्रिया त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात. तेलकट त्वचेसाठी योग्य असलेल्या तेलांबद्दल जाणून घेऊया…

जोजोबा तेल
हे त्वचेला मॉश्च्युराईज करून मऊ आणि गुळगुळीत करते. सीबम उत्पादन नियंत्रित केल्यामुळे त्वचा चिकट दिसत नाही. परंतु जास्त प्रमाणात ते वापरु नका. एक थेंब तुमच्या त्वचेसाठी पुरेसा आहे. हलक्या हातांनी चेहऱ्याची मालिश करा.

टी-ट्री ऑईल
तेलकट त्वचेसह पिंपल्सचीही समस्या असल्यास हे तेल वापरा. वापरण्यापूर्वी ते हलके डायल्युट करा. त्यातील अँटी-बॅक्टेरियल घटक पिंपल्सच्या बॅक्टेरियांना काढून टाकून आराम देईल आणि तुमची त्वचा स्वच्छ व सुंदर बनवेल.

ऑर्गन ऑईल
हे तेल खूप हलके असते. हे तुमच्या त्वचेमध्ये सीबम उत्पादन पातळी राखण्यास मदत करते. या तेलात असलेले व्हिटॅमिन ई आणि एंटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म तुम्हाला चमकत्या त्वचेसह मुरुमांपासून देखील आराम देते.

रोजहीप ऑईल
यातील व्हिटॅमिन ए आणि लिनोलिक ऍसिड तुमच्या त्वचेला मॉश्च्युराईज करते तसेच मुरुमांपासून आराम देते. तसेच ते वृद्धावस्थेच्या खुणा दूर करण्यास मदत करते आणि त्वचेला चमक देखील देते. नेहमी लक्षात ठेवा की गुलाब तेल आणि रोजहीप ऑईल दोन्ही भिन्न आहेत, त्यामुळे ते एक आहेत असे समजण्याची चूक करू नका.