चेहर्‍यासह हातांवर दिसत असलेले वाढत्या वयाचे परिणाम कमी करतील ‘हे’ 8 घरगुती उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वाढत्या वयाचे परिणाम केवळ चेहर्‍यावर नव्हे तर हातांवर सुद्धा दिसून येतात. त्वचेला सुरकुत्या आणि ड्राय-ड्राय होते. तरूण दिसण्यासाठी केवळ चेहर्‍याचीच नव्हे तर हातांची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा घरगुती टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहोत ज्या फॉलो करून हाताचा सॉफ्टनेस कायम राखता येऊ शकतो.

1. खोबरेल तेलात लिंबूचा रस मिसळा आणि त्याने हातांना 4-5 मिनिटे मसाज करा. काही दिवस रोज याचा वापर करा.

2. हात मुलायम राखण्यासाठी आणि उजळण्याठी लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाब जल मिसळून ते हातावर लावा आणि रात्रभर तसेच ठेवून सकाळी धुवून टाका.

3. सैंधव मीठ, लिंबू, ऑलिव्ह ऑईलचे थोडे थेंब घेऊन एक लिक्विड तयार करा आणि याने हाताला काहीवेळ मसाज करा.

4. हात ड्राय झाले असतील तर गुलाबजल आणि दूधात एक चिमूटभर हळद मिसळून हातांना 4-5 मिनिटे मसाज करा.

5. हात खुप टॅनिंग झाले असतील तर फ्रेश एलोवेरा जेलने 3-4 मिनिटे मसाज करा. राभर लावून ठेवा आणि सकाळी साध्या पाण्याने धुवून टाका.

6. झोपण्यापूर्वी बोरोलिन किंवा पेट्रोलियम जेली लावून झोपा.

7. हाताचे टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा कापून तो हातावर रगडा. किंवा किसून रस काढा आणि त्याने मसाज करा.

8. आठवड्यातून एक-दोन वेळा स्क्रबिंग जरूर करा. स्क्रबिंगसाठी साखर, कॉफी पावडर आणि लिंबूचा रस वापरा आणि हलक्या हाताने स्क्रबिंग करा.