Serum For Winter : हिवाळ्यात कोरडेपणा दूर करण्यासह, त्वचेवर चमक आणेल ‘हे’ सिरम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   थंड हवामान आणि त्यासोबत येणारे प्रदूषण आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव करते. या हंगामात त्वचेवरील कोरडेपणा इतका वाढतो की, कोल्ड क्रीमचा सहज परिणाम होत नाही. तसे, बाजारात विविध प्रकारचे फेस सिरम उपलब्ध आहेत जे फारच महाग आहेत, तसेच त्वचेवर त्याचे दुष्परिणाम बर्‍याच वेळा होतात. आम्ही तुम्हाला अ‍ॅलोवेरा आणि गुलाबजल सिरमबद्दल सांगत आहोत जे थंड हवामानात तसेच तुमच्या बजेटनुसार तुमच्या त्वचेचे रक्षण करते. या सिरमचा उपयोग केल्याने त्वचा मऊ होईल, तसेच त्वचेला सर्व पोषक द्रव्ये मिळतील. त्वचेसाठी फायदेशीर असा हा सिरम घरी बनवणे सोपे आहे. चला घरी हे सिरम कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.

साहित्य :

– 2 चमचे एलोवेरा जेल

– 2 चमचे गुलाब पाणी

– 2 कॅप्सूल व्हिटॅमिन ई

असे तयार करावे सिरम

हे फेस सिरम करण्यासाठी एक वाटी घ्या आणि त्यात एलोवेरा जेल आणि गुलाब पाणी घाला. आता त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. तिन्ही एकत्र मिसळा आणि आपला सिरम तयार आहे. एक ड्रॉपर बाटली घ्या आणि त्यात हा सिरम ठेवा. आपण दिवसातून दोनदा हा सिरम वापरू शकता. सिरम लावण्यापूर्वी चेहरा स्ववच्छ धुवा. सिरम लावा आणि थोडासा हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा आणि थोड्या वेळाने चेहरा धुवा.

होममेड सिरमचे फायदे

कोरफड, गुलाबाचे पाणी आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलपासून तयार केलेले हे सिरम पूर्णपणे नैसर्गिक आहे, कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याचा वापर करून त्वचा चमकदार होईल.

हा सिरम चेहर्‍यावरील काळे डाग करेल दूर

– सिरममध्ये उपस्थित गुलाबजल आणि कोरफड चेहऱ्यावर मॉइश्चरायझर म्हणून काम करेल.

– गुलाब पाण्यात अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी आणि तरुण ठेवतात. ते त्वचेचा पीएचदेखील राखतात.

– व्हिटॅमिन ईमुळे त्वचेचे नुकसान कमी होते. तसेच त्वचेचे नुकसान होण्यापासून रोखेल.

You might also like