Thicker Eyebrows Tips : काळे आणि दाट आयब्रो हवेत तर ‘या’ पद्धतीनं त्याची काळजी घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपले डोळे आणि आयब्रो महत्त्वपूर्ण असतात. काही मुली केस गळतीमुळे चिंता करतात तर काही आयब्रो दाट नसल्यामुळे अस्वस्थ असतात. आयब्रोचे केस कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की अॅलर्जी, ऑटोइम्यून डिसऑर्डर किंवा फंगल इन्फेक्शन. ज्याप्रमाणे डोक्यावर दाट केस आपले व्यक्तिमत्व वाढवते, त्याचप्रमाणे दाट आयब्रो देखील आपले सौंदर्य वाढवतात. जर तुमचे आयब्रो दाट नसतील तर आम्ही तुम्हाला घरबसल्या याचे काही उत्तम घरगुती उपायांविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल…

ऑलिव्ह तेलाने मसाज

जर आयब्रो दाट नसतील तर रोज रात्री झोपण्यााआधी आयब्रोला तेल लावून 5 ते 10 मिनिटे मसाज करा. या तेलाच्या मसाजने तुमच्या आयब्रोची ग्रोथ वाढेल.

कोरफड जेलने मसाज करा

जर आपल्याला दाट आणि काळे आयब्रो हवे असेल तर कोरफड जेल लावा. थोडेसे कोरफड जेल आयब्रोला लावून दिवसातून दोनदा मसाज केल्याने दाट होतात.

कच्च्या दुधाने वाढवा आयब्रोची ग्रोथ

कापसाच्या सहाय्याने एक चमचे कच्चे दूध आयब्रोला लावा. आयब्रो वाढवण्यासाठी आणि काळे आणि चमकदार करण्यासाठी दुधाने आयब्रोला मसाज करा.

आयब्रोसाठी फायदेशीर नारळ तेल

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या नारळ तेलाचे फायदे आपल्या केसांसाठी जितके आहेत तितकेच ते आपल्या आयब्रोंसाठी देखील आहेत. जर तुम्हाला दाट व काळे आयब्रो हवे असतील तर नारळ तेलाने मसाज करा.

कांद्याचा रस

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस खूप चांगला आहे. दिवसातून एकदा कांद्याचा रस आयब्रोला लावल्याने ते लवकर काळे आणि दाट होतात.