लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  लांबसडक, दाट आणि मजबूत केस तुमच्या सौंदर्यासह कॉन्फिडंस सुद्धा बूस्ट करतात. पण यासाठी थोडी मेहनत करावी लागते. शॅम्पू करण्यापूर्वी तेल लावणे, शॅम्पूनंतर कंडीशनरचा वापर, ओल्या केसात कंगवा न घालणे इत्यादी काळजी घ्यावी लागते. आज आम्ही केस लांबसडक आणि दाट करण्यासाठी एका अशा तेलाबाबत सांगणार आहोत ज्याचा परिणाम एक ते दोन आठवड्यातच दिसू लागेल.

मोहरी आणि मेथीदाण्यापासून तयार केलेले तेल

तुम्ही अवघ्या 10 मिनिटात 2 ते 3 महिन्याचे तेल तयार करू शकता. एवढे तेल एकदाच बनवून स्टोअर करू शकता, कारण हे तेल लवकर खराब होत नाही. मोहरी आणि मेथी दोन्ही केसांसाठी खुप लाभदायक आहे.

असे तयार करा तेल

एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि यामध्ये मेथी दाणे टाकून रात्रभर ठेवा. दुसर्‍या दिवशी 5 ते 7 मिनिटांसाठी हे तेल मंद आचेवर तापवा. जेव्हा मेथीचे दाणे काळे होऊ लागतील तेव्हा गॅस बंद करा. नंतर तेल थंड होऊ द्या.

तेल वापरण्याची पद्धत

रात्री या तेलाने आपल्या केसांच्या मुळांचे मालिश करा आणि केंस विंचरून बांधून घ्या. यानंतर सकाळी शॅम्पू करा. यामुळे केस लवकरच लांबसडक आणि दाट होतील. चांगल्या परिणामासाठी सुरुवातीला आठवड्यात 3 वेळा या तेलाचा वापर करा.