Fashion Designer Prathyusha Garimella | भारतातली टॉपची फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्लाचा घरात संशयास्पद मृत्यू

हैदराबाद : वृत्तसंस्था – Fashion Designer Prathyusha Garimella | भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्ला हिचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्युक्षा हिच्या तेलंगणा (Telangana) येथील राहत्या घरात मृतदेह पोलिसांना आढळून आला. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार प्रत्युषाचा तेलंगणातील बंजारा हिल्स (Banjara Hills) येथील तिच्या राहत्या घरात मृतदेह (Dead Body) सापडला आहे. पोलिसांना तिच्या बेडरूम मध्ये कार्बन मोनॉक्साईड सिलेंडर (Carbon Monoxide cylinder) देखील सापडला असून पोलिसांनी जप्त केला आहे. (Fashion Designer Prathyusha Garimella)

 

 

मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युक्षा गरिमेल्ला घरात असताना तिच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी कामानिमित्त दरवाजाची बेल वाजवली. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी (Telangana Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बराचवेळ बेल वाजवली मात्र तिने दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या घराचा मुख्य दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. पोलिसांना घरात तपास केला असता तिथे प्रत्युषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी रुग्णालयात पाठवला.
प्रत्युषा ही तेलंगणातील बडी हस्ती असून ती फक्त तेलंगणाच नाही तर संपूर्ण देशात फॅशन डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे.
तिच्या निधनामुळे तेलंगणामध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
प्रत्युषाचा स्वत:च्याच घरात संशयितरित्या मृतदेह आढळल्याने पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Fashion Designer Prathyusha Garimella | Top fashion designer Prathyusha Garimella was found dead at her residence in Banjara Hills, Telangana, says police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nilesh Rane | ‘पवारांबद्दल बाळासाहेब किती अचूक बोलायचे, हे ठाकरेंना कळलं असेल’ – निलेश राणे

 

Corona Fourth Wave | ज्याची सर्वांना भीती  होती तेच घडलंय, ‘कोरोना’ची चौथी लाट सुरु – WHO

 

PM Narendra Modi in Dehu | PM मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज मंदिर भागविकांसाठी दोन दिवस बंद