‘फॅशन’ डिझायनींगच्या तरुणीला संचालक-प्राचार्याकडून मारहाण, सर्वत्र खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – फॅशन डिझायनींग करणाऱ्या तरुणीला संस्थेच्या संचालक आणि प्राचार्यांनी मारहाण केल्याचा धक्कादयक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव शहरातील गणेश कॉलीनीतल गिताशंकर जलतरण तलावाजवळ असलेल्या निमजाई फाऊंडेशन संचलीत फॅशन डिझायनींग व ब्युटीपार्लर कोर्सेस चालवले जातात. या कर्सेसमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने शासकीय अनुदानातून विद्यार्थीनीने शिष्यवृत्ती मिळेल का अशी विचारणा केल्याने वाद झाले. यातूनच परिक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थीनीला संचालक आणि प्राचार्य़ांनी बोलावून घेत तिला मारहाण केली, असा आरोप तरुणीने केला आहे. ऐश्वर्य़ा पाटील असे या तरुणीचे नाव आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तरुणी या संस्थेमध्ये फॅशन डिझायनींगचा कोर्स करते. महाविद्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर विद्यार्थी आपसात चर्चा आणि कोर्सेस संदर्भात माहितीची देवाण-घेवाण करतात. आज पासून फॅशन डिझायनिंगची परिक्षा सुरु झाली आहे. संस्थेच्या संचालक शितल पाटील यांनी ऐश्वर्याला बोलावून घेतले. यावेळीस तिने कोर्सेस संदर्भात विद्यार्थ्यीनींना शासकीय अनुदानातून पैसे मिळतील का, अशी विचारणा केली. यातून वाद वाढत गेल्याने संचालक शितल पाटील यांच्यासह प्राचार्यांनी मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहचले. हे प्रकरण जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोहचले. या ठिकाणी महाविद्यालयाचे संचालक व प्राचार्य विरुद्ध तक्रार दिली. जीवे मारण्याची धमकी शासकीय अनुदानातून यापूर्वीही वेगवेगळ्या कोर्सेस केल्याने माझ्या खात्यात पैसे आले आहेत. येथे अ‍ॅडमीशन घेतल्यावर संस्थेकडून पासबुकच्या झेरॉक्स घेण्यात आले. म्हणून मी आमच्या खात्यात पैसे जमा होतील का याची विचारणा केली. याचा राग येऊन मारहाण करून वरून फेकून देण्याची धमकी दिल्याचे ऐश्वर्या पाटीलने सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/