‘या’ तेलाच्या वापराने पांढरे केस होतील काळे, असा करा वापर, जाणून घ्या कृती

पोलिसनामा ऑनलाइन – कमी वयात केस पांढरे झाल्याने व्यक्तीला मानसिकदृष्ट्या त्रास होऊ लागतो. यामुळे कमी वयात केमिकल युक्त हेयर कलरचा वापर केला जातो, मात्र यानंतर समस्या वाढतच जाते. खराब जीवनशैली, खाण्यात भेसळ, केमिकलयुक्त शॅम्पू, हेयरकलर, तेल इत्यादी केस पांढरे होण्याची कारणे आहेत. या समस्येतून मुक्तता मिळू शकते, यासाठी काही तेलांचा वापर केला पाहिजे, हे तेल कोणती ते जाणून घेवूयात…

असे तयार करा तेल

1 खोबरेल तेल आणि मेहंदीची पाने
3-4 चेमचे खोबरेल तेल उकळवा आणि त्यामध्ये मेहंदीच्या पानाचा एक गुच्छ टाका. तेल करड्या रंगाचे होईपर्यंत उकळवा. यानंतर तेल थंड करून केसांच्या मुळाशी 40 मिनिटे लावून ठेवा. नंतर धुवून टाका.

2 एरंड आणि मोहरीचे तेल
2 चमचे मोहरीच्या तेलात 1 चमचा एरंड तेल मिसळा, थोडावेळ गरम करा. थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाशी लावा. 10 मिनिट मॉलिश करा. 45 मिनिट तसेच ठेवून नंतर धुवून टाका. आठवड्यातून 3 वेळा वापर करा.

3 खोबरेल तेल आणि आवळा
3 चमचे खोबरेल तेलात 2 चमचे आवळा पावडर मिसळा. एका भांड्यात हे गरम करा. नंतर तेल थंड करून केसांच्या मुळाशी मालिश करा. रात्रभर ठेवा आणि सकाळी धुवून टाका.

4 ऑलिव्ह आईल आणि काळे तीळ
एका कपात 1 मोठा चमचा काळे तीळ घ्या. यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. हे गरम करून घ्या. थंड झाल्यानंतर हे मिश्रण केसांना लावून मालिश करा. एक तास ठेवा आणि केस धुवून टाका. हा उपाय रोजसुद्धा करता येईल.