Fast Aging | ‘या’ 5 सवयींमुळे ऐन तारुण्यात दिसू शकता म्हातारे, आजपासूनच व्हा दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fast Aging | आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक लवकर म्हातारे दिसू लागतात. आपली दिनचर्याच अशी झाली आहे की आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. अन्न आणि दिनचर्याही बिघडली आहे. आज आम्ही या बातमीमध्ये अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यांमुळे लोक लवकर वृद्ध होतात. तुम्हालाही या सवयी असतील तर आजच त्या सोडा. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. (Fast Aging)

 

1. झोपेचा अभाव
आजकाल अनेकांना काम आणि अभ्यासामुळे पुरेशी झोप लागत नाही. पुरेशी झोप न घेण्याची सवय लवकर तुम्हाला वृद्ध करू शकते. पुरेशी झोप न मिळाल्याने तणावाची समस्याही वाढते. आजच्या तरुणांमध्ये ही समस्या झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात आणि केस अवेळी गळायला लागतात. त्यामुळे माणूस म्हातारा दिसू लागतो.

 

2. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी
बाजारात मिळणारे जंक फूड्स अनेकांना आवडते. चरबीयुक्त, प्रक्रिया केलेले अन्न आणि पॅक केलेले अन्न खाल्ल्याने अकाला वृद्धत्व येऊ शकते. या गोष्टींमध्ये खराब कोलेस्ट्रॉल असते, ज्यामुळे अनहेल्दी व्हाल आणि लवकरच वृद्ध दिसू लागाल. (Fast Aging)

 

3. धूम्रपान आणि मद्यपान
बरेच लोक धूम्रपान आणि मद्यपान करतात. हळूहळू ही सवय नंतर व्यसन बनते. याचे सेवन केल्याने आरोग्याची मोठी हानी होऊ शकते. जे लोक जास्त मद्यपान आणि धुम्रपान करतात, ते लवकर वृद्ध दिसू लागतात.

4. जास्त स्ट्रेस घेणे
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, अति टेन्शनमुळे सुद्धा लोक लवकर वृद्ध दिसू लागतात. जास्त ताण आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतो. हे प्राणघातक आणि सायलेंट किलर मानले गेले आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा जास्त ताण न घेण्याचा प्रयत्न करा.

 

5. कमी पाणी पिणे
निरोगी राहण्यासाठी जास्तीतजास्त पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. शरीरात 60 टक्के पाणी असते.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ लागते, त्यामुळे त्वचेवर बारीक रेषा आणि काळी वर्तुळे दिसू लागतात. यामुळे लवकर वृद्ध दिसू लागता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fast Aging | these bad fast aging habits are pushing you towards old age

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Palghar News | संतापजनक ! अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील धक्कादायक प्रकार

Anti Corruption Bureau (ACB) Nanded | लाच घेताना पकडलेल्या पोलिसाचे एसीबीच्या जाळ्यातून पलायन

Gold-Silver Rate Today | उच्चांकी दरापेक्षा आज सोनं 6 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर