घाईघाईत जेवल्यानं वाढतं वजन, यामुळे होतात ‘हे’ 3 गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

पोलीसनामा ऑनलाइन – बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांकडे जेवणासाठी देखील वेळ नसतो. कामाचा व्याप, घाई, आदी कारणे सांगून काही लोक खुप घाईघाईत जेवतात. परंतु, हे कारण योग्य नाही. जर तुम्ही व्यवस्थित जेवला नाहीत तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, आणि तुमचे काम ठप्प होऊ शकते. शिवाय, जगण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी जेवण हो अतिशय महत्वाचा भाग आहे, त्यामुळे तुमच्या कामापेक्षाही जेवण करणे यास महत्व दिले पाहिजे. चांगल्या वातावरणात, शांतपणे, व्यवस्थित चावून जेवण केल्याने आरोग्य चांगले राहते. मात्र, घाईघाईत जेवल्याने कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात ते आपण जाणून घेणार आहोत.

1 लठ्ठपणा
घाईघाईत जेवण केल्याने अन्न नीट चावून खाल्लं जात नाही. यामुळे वजन वाढते. शरीरात मेटाबॉलीक सिंड्रोमवर प्रभाव पडु शकतो.

2 टाईप 2 डायबिटीस
घाईघाईत खाल्ल्याने डोक्याला विशिष्ट संदेश मिळत असतो. ज्यामुळे हार्मोन्सवर नकारात्मक परीणाम होतो. इन्सुलीन प्रभावित होऊन टाईप 2 डायबिटीस होण्याची शक्यता असते.

3 तोडांचे विकार
तसेच अन्न दातांमध्ये अडकते. यामुळे कॅव्हीटीज होते.

हे लक्षात ठेवा
* जेवणासाठी किमान 25 मिनिटे तरी द्या.
* जेवताना अन्न चावून खा.
* 20 मिनीटांचा वेळ दिलात तर व्यवस्थीत चावून अन्न खाऊ शकता.
* जेवण जास्तवेळ चावून खाल्ल्याने जेवण कमी जाते. अन्नाचे पचन होते. 2 तासांनी पुन्हा खाण्याची सवय राहात नाही.