सावधान ! आता कॉलेज कॅन्टीनमध्ये ‘नो-पिझ्झा, नो-बर्गर’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या धावपळीच्या जगात तरुणाईचा फास्ट फूडकडे कल वाढला आहे. अनेकजण जेवणापेक्षा फास्ट फूडवरच आपला दिवस काढत असतात. फास्ट फूट शरिराला चांगले नाही हे माहीत असताना देखील तरुण मुलं-मुली जीभेचे चोचले पुरवण्यासाठी फास्ट फूट खातात. त्यामुळेच नागपूर विभागात आता फास्ट फूडला नो एण्ट्री करण्यात आली आहे. नागपूर विभागातील 265 महाविद्यालयांना अन्न व औषध प्रशासन विभागाने पत्र पाठवून महाविद्यालायात पिझ्झा आणि बर्गरसारखे पदार्थ विक्री करण्यावर बंदी घातली आहे. अगर कॉलेजच्या कॅण्टीनमध्ये अशा पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास कॅण्डीन चालक आणि प्राध्यापाकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

बदलत्या जिवन शैलीप्रमाणे तरुणाईच्या जीवनमानात देखील बदल झाले आहेत. पूर्वी महाविद्यालयात विद्यार्थी घरून डबे घेऊन जात होते. मात्र, आता महाविद्यालयात जाताना घरचा डबा घेऊन जात नाहीत. तर महाविद्यालयात असलेल्या कॅण्टीनमध्ये पिझ्झा आणि बर्गर सारख्या पदार्थावर ताव मारताना दिसत आहेत. मात्र, नव्या नियमानुसार कॅण्टीनमध्ये फास्ट फूड कॉलेजमध्ये नो एण्ट्री करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

काहींचे समर्थन तर काहींचा विरोध
सध्या सुपरफास्टचा जमाना आहे, अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या नियमाचे काही विद्यार्थ्यांनी समर्थन केले आहे. तर काही विद्यर्थ्यांनी त्याला विरोध केला आहे. फास्ट फूडच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना पचनाचे आजार जडू लागले आहेत. त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होत असून त्यांच्यात लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालक देखील चिंताग्रस्त असून त्यांनी याविषयी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळेच अन्न व औषध प्रशासनाने हा नर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

You might also like