सावधान! आरोग्य ‘सेतु’च्या नावावर तुम्हाला फसवण्याच्या प्रयत्नात सायबर ‘भामटे’

नवी दिल्ली : देशाच्या सायबर सुरक्षा विभागाने शनिवारी म्हटले की, आरोग्य सेतु मोबाईल अ‍ॅपच्या नावावर फिशिंग हल्ल्याचे प्रकार सतत वाढत आहेत. कोरोना व्हायरस महामारीबाबत यूजर्सना उत्सुकता आहे, ज्याचा सायबर गुन्हेगार फायदा घेत आहेत.

फिशिंग हल्ला म्हणजे काय?
हा एक प्रकारचा सोशल इंजिनियरिंगचा प्रकार आहे, ज्याचा वापर करून नेहमी यूजर्सचा डेटा चोरी केला जातो. यामध्ये लॉगिन क्रेडेंशियल आणि क्रेडिट कार्ड नंबर सामिल आहे. हा हल्ला तेव्हा होतो, जेव्हा एक हल्लेखोर, एका विश्वसनिय विक्रेत्याच्या रूपात, एका पीडित युजरला एक ईमेल, इन्स्टट मेसेज किंवा संदेश उघडण्यात धोका देतो.

यात म्हटले आहे की, यूजर्सचा महत्वाचा डेटा चोरण्यासाठी हल्लेखोर जागतिक आरोग्य संघटना आणि लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म, जसे की झूम अ‍ॅपवरून लिंक्ड टूल्सचा वापर करत आहेत.

आरोग्य सेतु अ‍ॅप यूजर्सना सावध करण्यासाठी ब्ल्यूटूथ आणि जीपीएसचा वापर करते.

सीईआरटी-इनकडून मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे की, अलिकडच्या काळात थ्रेट अ‍ॅक्टर्स कोरोना व्हायरस महामारीचा फायदा उचलत आहेत, ते अ‍ॅक्टिव्हिटी, माहिती आणि बातम्यांच्या नावावर यूजर्सना त्यांची महत्वाची माहिती देण्यासाठी आपल्या जाळ्यात ओढतात.

कम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया (सीईआरटी-इन) सायबर हल्ले आणि भारतीय सायबर स्पेसचे रक्षण करणारी राष्ट्रीय प्रौद्योगिक शाखा आहे.

यामध्ये म्हटले आहे की, सायबर हल्लेखोर झूम, गूगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स, आरोग्य सेतु अ‍ॅप आणि डब्लूएचओसारख्या लोकप्रिय व्हिडिओ प्लेटफॉर्मच्या नावावर फिशिंग मेसेजेसद्वारे एसएमएस, व्हाट्सएप (फिशिंग) किंवा फिशिंग ईमेलने लोकांचा डेटा चोरतात.

यात म्हटले आहे की, सायबर हल्लेखोर पीडित व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी आणि नंतर तिला सरकारी पॅकेज, कोरोनाच्या दरम्यान सुरक्षेच्या सूचना, कोरोना परीक्षण किट, कोरोना वॅक्सीन, पैसे देणे आणि दान देण्याच्या लिंक पाठवण्यासाठी नकली डोमेनचा वापर करत आहेत.