वेगानं वाढतेय व्हॉट्सअप ‘हायजॅकिंग’, व्यक्तिगत फोटो आणि चॅटद्वारे केले जातेय ‘ब्लॅकमेल’

मुंबई : महाराष्ट्र सायबर विभागने व्हॉट्सअप युजर्सना हॅकिंगबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांनी हॅकर्सच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत सांगितले आहे. ते कशाप्रकारे अकाऊंट हॅक करत आहेत, ज्यामुळे व्हॉट्सअप युजर्सची प्रायव्हसी धोक्यात तर आहेच, शिवाय त्यांना ब्लॅकमेल करून पैसेसुद्धा उकळले जात आहेत.

हॅकर्स व्हॉट्सअप अकाऊंट हॅक करून आणि नंतर जबरदस्तीने पैसे उकळत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या व्हॉट्सअप अकाऊंटपर्यंत पोहचल्यानंतर, सायबर गुन्हेगार त्यास आपले कॉन्टॅक्ट किंवा त्याच्याशी संबंधीत ग्रुपला अश्लील फोटो पाठवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत आहेत.

महाराष्ट्र सायबरने म्हटले की, अनेकदा असे आढळले आहे की, त्या व्हॉटसअप ग्रुपवर अश्लिल फोटो पोस्ट केले जातात, ज्यामध्ये पीडीत सदस्य असतो. याशिवाय, गुन्हेगार पीडित व्यक्तीशी संपर्क करून पैसे मागतात.

व्हॉट्सअ‍ॅप हॅकर्सची काम करण्याची पद्धत
जेव्हा कुणी व्हॉट्सअप युजर आपला फोन बदलतो, त्यावेळी हे पाहणे गरजेचे आहे की, नवा डिव्हाईस त्याच्या मोबाईल नंबरशी जोडलेला आहे. हे व्हॉट्सअप पडताळणी कोडच्या माध्यमातून केले जाते. हॅकरला युजर्सचा मोबाईल नंबर माहिती असतो आणि हल्ल्याची ही पूर्ण साखळी एक व्यक्ती (मि.पी.) च्या सोबत सुरू होते. जर मि.पी. ने आपला व्हॉट्सअप पडताणी कोड दिला तर, तो हॅकरला अपल्या अकाऊंटपर्यंत पोहचण्याची परवानगी देतो.

एकवेळ मि.पी. चे अकाऊंट हॅक झाले, की हॅकरला आपल्या सर्व कॉन्टॅक्ट नंबरसह सर्व ग्रुपपर्यंत सहज पोहचता येते. यानंतर एक चेन रिअ‍ॅक्शन सुरू होते. ही माहिती घेऊन की, मि. के. मिस्टर पी. च्या यादीत सर्वात जास्त संपर्कातील व्यक्ती कोण आहे, हॅकर मिस्टर पीची तोतयागिरी करतो आणि मि. ला आश्वस्त करतो की, त्याचा व्हॉट्सअप पडताळणी कोड त्याच्यापर्यंत पोहचत नाही, यासाठी त्यांने कोड मिस्टर के. च्या फोनवर पाठवला आहे. मिस्टर के. त्या जाळ्यात फसतो, विचार न करता की, हा त्याचा स्वताचा पडताळणी कोड आहे. तो हा कोड देताच, हॅकर त्याचे खातेसुद्धा हॅक करतो.