Fastag | अ‍ॅक्सीडेंट झाल्यानंतर गाडीवरील फास्टॅग काढून टाका, जाणून घ्या काय आहे कारण?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Fastag | रस्ते अपघातात गाडीचे नुकसान झाल्यानंतर लोक गाडी तिथेच सोडून देतात किंवा जवळपासच्या पोलीस ठाण्यात उभी करतात आणि गाडीला लावलेला फास्टॅग (Fastag) काढत नाहीत. या छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अशाप्रकारे गाडीच्या फास्टॅगमध्ये असलेले पैसे परत घेता येऊ शकत नाहीत. यासाठी अशा स्थितीत वाहन मालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. वाहनावर फास्टॅग तसाच ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते जाणून घेवूयात.

 

रस्ते परिवहन मंत्रालयाच्या (ministry of road transport) अधिकार्‍यांनुसार, अपघातानंतर वाहनावरून फास्टॅग (Fastag) काढला पाहिजे.

 

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार (National Highway Authority of India Highway) फास्टॅग हटवणे दोन कारणासाठी आवश्यक आहे.
पहिले कारण म्हणजे फास्टॅगमध्ये एक छोटी चिप असते. काच फुटणे किंवा तडा गेल्यानंतर फास्टॅगमधील चिप डॅमेज होऊ शकते.
मात्र वरून दिसण्यास फास्टॅग ठिक वाटतो, परंतु टोलमध्ये चिप काम करणार नाही.
यामुळे तुमचे वाहन विना फास्टॅग मानले जाईल आणि वाहन चालकाला पेनल्टी द्यावी लागू शकते.

 

दूसरे कारण म्हणजे, डॅमेज गाडीवरून फास्टॅग काढणे यासाठी आवश्यक आहे कारण जर फास्टॅगमध्ये बॅलन्स असेल आणि तो दुसर्‍या फास्टॅगमध्ये (Fastag) ट्रान्सफर करायचा आहे.
तर यासाठी जुना फास्टॅग आवश्यक असेल. त्याच्या नंबरवरूनच बॅलन्स पैसे नवीन फास्टॅगमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
यासाठी दुर्घटनेनंतर किंवा काच तुटल्यानंतर फास्टॅग आवश्यक काढावा.

 

सायबर क्राईमसुद्धा होऊ शकतो

 

सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया सांगतात की, फास्टॅग फेकणे किंवा कुठेही टाकणे अनेकदा नुकसानकारक ठरू शकते.
विशेषता ते फास्टॅग जे बँक अकाऊंटसोबत लिंक असतात. अशा फास्टॅगद्वारे सायबर गुन्हेगार काही फ्रॉड सुद्धा करू शकतात.

 

Web Title : Fastag | fastag in car do not leave the after the accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Eyesight growth Tips | दृष्टी मजबूत करणारे ‘हे’ आहेत 4 उपाय, जाणून घ्या जबरदस्त फायदे

Pune Crime | … म्हणून दुकानमालकाच्या डोक्यात हातोड्याने केली मारहाण; विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवरील घटना

Pune Crime | ‘ब्रेकअप’ नंतर तरुणीला लग्नाची गळ ! ‘तुझे फोटो व्हायरल करेन, आई-वडिलांना ‘खल्लास’ करण्याची धमकी; ‘मजनू’ ‘गोत्यात’, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना