दुप्पट टोल देण्यापासून वाचवू शकते ही FASTag ट्रिक, केवळ ‘या’ नंबरवर द्यावा लागेल Missed Call
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता देशभरात टोल टॅक्ससाठी बहुतांश लोकांनी फास्टॅग चा वापर सुरू केला आहे. तुमच्या वाहनाच्या विंडशील्डवर असलेल्या या स्टिकरद्वारे थेट FASTag खात्यातून टोल कापला जातो. दरम्यान, FASTag रिचार्ज करणे देखील आवश्यक असते आणि यामुळे त्याची शिल्लक देखील तुम्हाला तपासावी लागते.
भरावा लागतो दुप्पट टोल
वास्तविक, जर तुमची शिल्लक कमी असेल तर अशावेळी तुम्हाला टोल बुथवर दुप्पट टोल भरावा लागतो. यासाठी, प्रवास सुरू करण्यापूर्वी फास्टॅग रिचार्ज करणे चांगले होईल. आज आम्ही तुम्हाला फास्टॅग बॅलन्स तपासण्याच्या काही सोप्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत.
कसे काम करते FASTag
फास्टॅग कसे काम करते हे आधी समजून घेऊ. FASTag तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असते आणि ते टोल बूथवर पेमेंट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी (RFID) वापरते.
हे बस, कार यांसारख्या वाहनांच्या विंडस्क्रीनवर मध्यभागी लावलेल्या स्टिकरसारखे असते. तुम्ही टोल बूथवर पोहोचताच, स्टिकर स्कॅन केला जातो आणि त्यात असलेल्या पैशातून तुमचा टोल टॅक्स भरला जातो.
—
मिस्ड कॉलने तपासा FASTag Balance
– फास्टॅग बॅलन्स तपासण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. मात्र, यासाठी तुम्ही प्रीपेड FASTag ग्राहक असणे आवश्यक आहे.
– यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक NHAI कडे रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.
– यानंतर तुम्ही टोल फ्री नंबर +918884333331 वर कॉल करून तुमचा बॅलन्स तपासू शकता.
– हा कॉल आपोआप डिस्कनेक्ट होतो आणि तुम्हाला एसएमएसद्वारे बॅलन्स समजतो.
अॅपद्वारे जाणून घ्या बॅलन्स
स्टेप 1 : स्मार्टफोनवर Play Store किंवा App Store उघडा
स्टेप 2 : Android फोन किंवा iPhone वर My FASTag अॅप डाउनलोड करा
UPI 123Pay | ‘हे’ नंबर मोठ्या कामाचे, इंटरनेटची गरज नाही; एका कॉलने करू शकता यूपीआय पेमेंट
स्टेप 3 : आता लॉगिन तपशील नोंदवा
स्टेप 4 : आता बॅलन्स रक्कम पाहू शकता.
Web Title :- how to check fastag balance with toll free number missed call
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update