FASTag द्वारे खरेदी करू शकता पेट्रोल-डिझेल, HPCL ने ‘या’ बँकेसोबत केला करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही लवकरच फास्टॅग (FASTag) द्वारे सुद्धा पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकता. प्रायव्हेट सेक्टरची आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) गुरूवारी एचपीसीएलच्या रिटेल आऊटलेटवर बँकेच्या फास्टॅगचा (FASTag) वापर करून फ्यूएल पेमेंटच्या सुविधेसाठी एका करारावर स्वाक्षरी केली. बँकेचे फास्टॅग निवडक एचपीसीएल रिटेल आऊटलेट्सवर खरेदी, रिचार्ज आणि बदलू शकता.

ही भागीदारी एचपीसीएल रिटेल आऊटलेटवर आयडीएफसी फर्स्ट बँक फास्टॅगचा (FASTag) वापर करणार्‍या 50 लाख यूजर्ससाठी फास्टॅगची खरेदी आणि वापराला सुविधाजनक बनवते. एचपीसीएल आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सिनियर मॅनेजमेंटकडून मुंबईत आयोजित कार्यक्रमात या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

 

मागील वर्षी कमर्शिअल वाहनांसाठी सुरू केली सुविधा

मागील वर्षी आयडीएफसी फर्स्ट बँकेने ‘ड्राईव्हट्रॅक प्लस’ पीओएस टर्मिनलच्या माध्यमातून हिंदूस्थान पेट्रोलियमच्या आऊटलेटवर कमर्शियल वाहनांच्या यूजर्ससाठी स्टॅग बॅलन्सचा वापर करून फ्यूएल पेमेंटची सुरूवात केली होती. या यूजर्सकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने बँकेला प्रायव्हेट वाहन यूजर्ससाठी सुद्धा सुविधेचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहित केले.

खासगी वाहनधारक आता एचपीसीएल रिटेल आऊटलेट्सवर इंधन खरेदीचे पैसे भरण्यासाठी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या फास्टॅगचा (FASTag) वापर करू शकतात आणि आकर्षक रिवॉर्ड पॉईंट मिळवू शकतात. आता फास्टॅगला ‘एचपी पे’ मोबाइल अ‍ॅपवर संलग्न करून फास्टॅग बॅलन्सचा वापर करून पेमेंट करता येऊ शकते.

 

Web Title :- FASTag | hpcl partners idfc first bank for fuel payments using fastags

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PF Nominee | ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या करू शकता आपल्या PF नॉमिनीमध्ये बदल; EPFO सांगत आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 113 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Nawab Malik |’समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांना दारुच्या दुकानाचा परवाना’; मलिकांचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)

Kranti Redkar | क्रांती रेडकरचं ट्विट चर्चेत, म्हणते – ‘नवाब चाचा…समीर वानखेडे… दहशत असावी तर अशी..’

Sharad Pawar | 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘उशिरा का होईना, शहाणपण आलं’

Earn Money | केवळ 5 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ बिझनेस; दरमहिना 30 हजार रुपयांची होईल कमाई, मोदी सरकार देईल सबसिडी

Multibagger Stock | 20 रुपयावरून 9,985 वर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदारांचे 20 हजार झाले 1 कोटी रुपये; तुमच्याकडे आहे का?