FASTag चा वापर केल्यास दरवर्षी 20,000 कोटींच्या इंधनात बचत : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात FASTag च्या वापरावरून सरकार आग्रही आहे. वाहनचालकांनीही FASTag चा वापर करावा, यासाठी आग्रह केला जात आहे. याच मुद्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag च्या पेमेंटवर 20,000 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होऊ शकते. याशिवाय 10,000 कोटी रुपयांचा महसूलही मिळू शकतो. तसेच टोल प्लाझावरील लाईव्ह स्थिती पाहण्यासाठी रेटिंग सिस्टिम लाँच करण्यात आली आहे. यामाध्यमातून महामार्गावर मिळणाऱ्या सुविधांचा पूर्णपणे तपास केला जाणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स टोलच्या संग्रहासाठी हायवे वर FASTag ने पेमेंट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. FASTag च्या वापरामुळे टोल प्लाझावर लावण्यात येणाऱ्या लांब रांगांवरून सूट मिळू शकते. गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की इंधनाच्या किंमतीवर दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांची बचत होईल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स टोल संग्रहात 10,000 कोटी रुपये प्रतिवर्ष रॉयल्टी वाढवण्यात येऊ शकते. 16 फेब्रुवारी, 2021 पासून टोल प्लाझावर FASTag च्या माध्यमातून पेमेंट करणे अनिवार्य केल्यानंतर टोल संग्रहात सातत्याने वाढ केल्याचे दिसले.

याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने सांगितले, की FASTag च्या माध्यमातून दैनंदिन टोल संग्रह 104 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गडकरी यांनी पुढे सांगितले, की टोलिंगसाठी एक नवा GPS आधारित सिस्टिम चालू केला जाणार आहे. जिथं प्रवेशावर प्रवाशांना अंतरासाठी वाहनचालकांनी पेमेंट करणे गरजेचे आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, या प्रणाली सादर करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे. डिसेंबर 2016 मध्ये ई-टोलिंगच्या सुरुवातीनंतर याअंतर्गत कव्हर करण्यासाठी टोल प्लाझा 28 फेब्रुवारीला 793 पर्यंत पोहोचला आहे. हा आकडा मार्च 2018 मध्ये 403 होता.