मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 1 डिसेंबर नव्हे तर आता ‘या’ तारखेपासून FASTag ‘अनिवार्य’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर 1 डिसेंबर 2019 पासून फास्टॅगचा (FASTag) वापर करणे अनिवार्य केले होते. परंतू आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता फास्टॅग अनिवार्य असले तरी त्यांचा कालावधी वाढण्यात आला आहे. आता या कालावधीत वाढ करण्यात आली असून ही आवधी 15 दिवसांनी आणखी वाढवण्यात आला आहे.

आता राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅगचा वापर करण्यास 15 दिवसांचा जास्तीचा कालावधी दिला आहे त्यामुळे आता 1 डिसेंबर नाही तर 15 डिसेंबर ही अंतिम तारीख कळण्यात आली आहे. आता 15 डिसेंबर 2019 पासून टोल नाक्यावर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला फास्टॅग असणे अनिवार्य असेल.

सरकारच्या या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला आहे. सराकारने त्या वाहनचालकांना दिलासा दिला आहे ज्यांनी अजूनही आपल्या वाहनावर फास्टॅग लावलेले नाहीत. त्यांच्यासाठी हा कालावधी वाढवला आहे. आता अशा वाहन चालकांना आपल्या वाहनावर 15 डिसेंबरच्या आत फास्टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडून यासंबंधित नोटिफिकेशन जारी केले आहे.
Letter

काय आहे फास्टॅग –
फास्टॅग वाहनांसाठी एक प्रीपेड टॅग सुविधा आहे, ज्याद्वारे तुम्ही टोल नाक्यावर न थांबता वेळ न घालवता गाडी पुढे नेऊ शकतात. या रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशनचा वापर केला जातो.

एकदा की तुमच्या फास्टॅग अ‍ॅक्टिव्ह झाला की तुम्ही तो तुमच्या गाडीच्या काचेवर पुढे लावू शकतात. यानंतर टोल नाक्यावर गेल्यावर टोल आपोआप तुमच्या पेमेंट वॉलेटमधून लिंक केलेल्या बँक खात्यातून पैसे आकारण्यात येतील.

Visit : Policenama.com