Fastag Monthly Pass | रिचार्जच्या त्रासापासून होईल सुटका, ‘या’ सोप्या पद्धतीने ताबडतोब बनवा FASTag चा मंथली पास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fastag Monthly Pass | जर तुमचे वाहन असेल तर फास्टॅग ठेवणे आवश्य आहे. टोल टॅक्स (Toll Tax) आणि टोलच्या लांबच लांब रांगेपासून (Row on Toll Plaza) वाचायचे असेल तर फास्टॅगच सर्वात चांगला पर्याय आहे. यामध्ये सुद्धा दोन पर्याय मिळू शकतात. एक तर फास्टॅग नियमित रिचार्ज करत रहा किंवा एकदाच मंथली पास बनवा आणि रिचार्जच्या (Fastag Monthly Pass) त्रासापासून मुक्त व्हा. यापैकी फास्टॅगचा मंथली पास जास्त योग्य वाटतो. कारण यामुळे वेळेची बचत होते आणि काही सवलत सुद्धा मिळते.

 

फास्टॅगचा मंथली पास (Fastag Monthly Pass) असा तयार करा –

1- सर्वप्रथम www.ihmcl.co.in वर जा. येथे ‘फास्टॅग मंथली पास’ची लिंक दिसेल ज्यावर क्लिक करा.

2- येथे टोल प्लाझाचे नाव सुद्धा दिसेल, ते सिलेक्ट करा.

3- यानंतर संबंधीत अ‍ॅक्वायरिंग बँकेच्या पेजवर रि-डायरेक्ट केले जाईल. येथे टॅग आयडी किंवा गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर नोंदवा.

4- पासचा प्रकार, पास स्कीम निवडा आणि पेमेंट करा. मंथली पास तयार होईल.

 

PhonePe FASTag Recharge

फोनपेवरून फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी फोनपे अ‍ॅपवर रिचार्ज आणि पे बिल्स सेक्शनमध्ये फास्टॅग रिचार्जवर टॅप करा.

लिस्टमध्ये आपली फास्टॅग बँक निवडा.

स्क्रीननुसार, आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा इतर माहिती नोंदवा.

रिचार्ज रक्कम नोंदवा आणि पेमेंट पूर्ण करण्यासाठी पेमेंटवर टॅप करा.

PhonePe Fastag balance Check

सर्व प्रथम मोबाइल फोनमध्ये PhonePe अ‍ॅप उघडा आणि अगोदरपासून लॉगइन नसेल तर लॉगइन करा.

नंतर ‘सर्व पहा’ पर्याय दिसेल.

या पर्यायावर टॅप करा आणि नंतर ‘रिचार्ज आणि पेमेंट बिल’ पर्याय दिसेल.

रिचार्ज सेक्शन अंतर्गत एक पर्याय आहे FASTag रिचार्ज

FASTag Recharge पर्यायावर टॅप केल्यानंतर, फास्टॅग जारी करणारी बँक शोधा.

फास्टॅग जारी करणारी बँक सुद्धा सर्च बॉक्सद्वारे सर्च करू शकता.

तुमची बँक निवडा आणि वाहनाचा सर्व तपशील नोंदवा.

नंतर ‘कन्फर्म’ बटनवर क्लिक करा.

कन्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतर फास्टॅग अकाऊंटची सर्व माहिती दिसेल.

या माहितीमध्ये फास्टॅग खात्यातील उर्वरित रक्कम सुद्धा दाखवेल.

 

Web Title :- Fastag Monthly Pass | fastag monthly pass process know phonepe fastag recharge and phonepe fastag balance check process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून छत्रपती संभाजी महारांच्या स्मारकाविषयी महत्वाचा निर्णय

तुमचे सुद्धा असेल EPF Account तर आवश्य जाणून घ्या नवीन बदल, अन्यथा लाभापासून राहाल वंचित