वाहनावर FASTag चा वापर करणार्‍यांसाठी खुशखबर ! RBI नं यासंदर्भातील नियम केले सोपे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंथा – केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझावर 15 डिसेंबरपासून वाहनांसाठी Fastag अनिवार्य केले आहे. जर एखादे वाहन टोल प्लाझाच्या Fastag लेनमधून Fastagशिवाय जात असेल तर डबल टोल टॅक्स भरावा लागेल. दरम्यान, पहिल्या एक महिन्यासाठी, 15 जानेवारी, 2020 पर्यंत प्रत्येक महामार्गावरील चतुर्थांश टोल रोख व Fastag या दोन्ही पद्धतीने भरला जाईल. महत्वाचे म्हणजे, आरबीआयने Fastag रिचार्जचे नियम सुलभ केले आहेत, आता तुम्ही यूपीआय, एटीएम व क्रेडिट कार्ड, प्री-पेड इन्स्ट्रुमेंट्स वरूनही Fastag रिचार्ज करू शकता.

आरबीआयने सुलभ केले नवीन नियम :
30 डिसेंबर 2019 रोजी आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ग्राहक त्यांच्या अधिकृत Fastag खात्यांना सर्व अधिकृत मॉडेल्स आणि पेमेंटच्या साधनांसह लिंक करू शकता. यात यूपीआय खाती आणि मोबाइल वॉलेट्सचा समावेश असेल. ही खाती रिचार्ज करण्यात सुलभता वाढविण्यासाठी आणि फेल्ड ट्रान्सक्शन व्यवहाराची प्रकरणे जलद सोडविण्यासाठी हे पाऊल उचलले जाईल. आरबीआयने म्हटले की, ‘ग्राहकांना अधिक पैसे भरण्याचे पर्याय देऊन या प्रणालीची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने आणि प्रणालीतील सहभागींमध्ये स्पर्धा वाढविण्याच्या उद्देशाने आता सर्व अधिकृत पेमेंट सिस्टमला Fastag शी जोडण्याची परवानगी दिली जाईल.

काही दिवसांपूर्वीच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ग्राहकांना एनईटीसी Fastag ला भीम यूपीआयसह रिचार्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. एनपीसीआयने सांगितले की, भीम यूपीआय-आधारित मोबाईल अ‍ॅपद्वारे वाहन मालक त्यांचे Fastag रिचार्ज करू शकतील आणि त्यांना टोल प्लाझावर लांब रांगा लागण्याची गरज भासणार नाही.

Fastag म्हणजे काय –
हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग आहे, जे वाहनाच्या विंडशील्डवर लावले जाते, जेणेकरून वाहन टोल प्लाझामधून जाताना सेन्सर Fastag वाचू शकेल. तेथे स्थापित उपकरणे स्वयंचलितपणे टोल कर संकलित करतात. तुम्हाला गाडीने एनएचएआयच्या टोल प्लाझामधून ये – जा करायचे असेल तर लवकरात लवकर Fastag लावून घ्या. कारण , 15 जानेवारीनंतर कॅश लेन पूर्णपणे बंद होणार आहे.

दरम्यान, नवीन वाहन मालकांना FASTag बद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण नोंदणीच्या वेळीच हे उपलब्ध करुन दिले जाईल. मालकास फक्त FASTag खाते सक्रिय आणि रीचार्ज करावे लागेल. दरम्यान, आपल्याकडे जुनी कार असल्यास आपण सरकारच्या नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) प्रोग्रामद्वारे अधिकृत केलेल्या बँकांकडून FASTag खरेदी करू शकता. या बँकांमध्ये सिंडिकेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयडीएफसी बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि इक्विटास बँक यांचा समावेश आहे. आपण पेटीएम वरूनही FASTag खरेदी करू शकता.

कोणत्याही पॉईंट ऑफ सेल (POS) स्थानास भेट देऊन बँकेतून FASTag ऑफलाइन खरेदी करता येतो. दरम्यान, लांब रांगेत थांबण्यापेक्षा आणि वेळ वाचविण्यासाठी, ऑनलाईन अर्ज करणे सोपे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/