आता हायवेवर ‘फास्ट टॅग’ दाखवा पेट्रोल मिळवा, लवकरच उपलब्ध होणार ‘सुविधा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हायवेवर टोल नाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगामुळे मोदी सरकारने फास्ट टॅग (FASTag) वापरण्यावर भर दिला आहे. यातून तुम्ही प्रवास करत असताना टोल नाक्यावर कर भरु शकणार आहात. परंतू आता तुम्ही याच माध्यमातून हायवेवर इंधन देखील भरु शकणार आहेत. IDFC बँकने या सुविधेसाठी आरबीआयने मंजूरी दिली आहे. या नव्या वर्जनला FASTag २.० म्हणण्यात येईल परंतू या नावाला अजून अंतिम रुप देण्यात आलेले नाही.

सरकाराने सर्व टोल नाक्यावर १ डिसेंबर पासून फास्ट टॅग स्विकारला जावा असे सांगितले आहे. सरकारचा दावा आहे की या निर्णयाने वाहनांच्या ये-जा करण्यात सहजता येईल. टोल नाक्यावर लागणाऱ्या रांगांमधून सुटका मिळेल. याशिवाय कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन मिळेल.

अ‍ॅमेझान वरुन खरेदी करु शकतात टॅग

एनएचएआयने जानेवारी २०१९ मध्ये फास्ट टॅगची सुरुवात केली होती. तुम्ही हा टॅग अ‍ॅमेझानवरुन खरेदी करता येऊ शकता. सध्या ४५० टोल नाक्यावर टॅग स्वीकारला जात आहे.

७ बँकामध्ये मिळेल फॅस्टटॅग

सध्या तुमचे बँक खाते या फास्टटॅगला जोडण्यासाठी सात बँकांमध्ये सुविधा देण्यात आली आहे. ज्यात एसबीआय, ICICI , HDFC, Induslnd, paytm यांच्याकडे ही फॅस्टटॅगची सुविधा उपलब्ध आहे.

एनएचआयने मे महिन्यात केलेल्या घोषणेत सांगण्यात आले आहे की NHAI FASTag कोणत्याही बॅंकेला जोडण्यात आलेले नाही, तुम्ही तुमच्या सुविधेनुसार कोणत्याही बँकेत जाऊन तुमचे खाते फॅस्ट टॅगला जोडू शकतात. याशिवाय फॅस्टटॅगवर जीएसटी लावण्याचा देखील विचार सध्या करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त