FASTags यूजर्ससाठी मोठी बातमी ! NHAI चा इशारा, येथे मिळत आहेत बनावट फास्टॅग, अशी करा तक्रार

नवी दिल्ली : जर तुम्ही सुद्धा आपल्या कारला फास्टॅग लावला असेल किंवा फास्टॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. फास्टॅगमध्ये फ्रॉडची प्रकरणे समोर आली आहेत. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने लोकांना बनावट फास्टॅगबाबत सावध केले आहे. एनएचएआयने म्हटले की, काही घोटाळेबाजांनी बनावट फास्टॅग ऑनलाइन विकण्यास सुरूवात केली आहे. प्रत्यक्षात, या फवणूक करणार्‍यांनी एनएचएआय/आएचएमसीएल प्रमाणेच फास्टॅग विकण्यास सुरू केले आहे. हे फास्टॅग खर्‍या सारखेच दिसतात, परंतु ते बनावट आहेत. अशावेळी यूजर्सने अशा फ्रॉडपासून दूर राहिले पाहिजे.

बनावट फास्टॅगसाठी येथे करा तक्रार
एनएचएआयने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, जर तुम्ही चुकीने बनावट फास्टॅग खरेदी केला आहे तर तुम्ही राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाईन नंबर 1033 वर कॉल करून तक्रार करू शकता. सरकारने 15 फेब्रुवारी 2021 पासून देशभरात फास्टॅग अनिवार्य केला आहे. ज्यानंतर वाहनांना फास्टॅग नसल्यास टोल प्लाझावर दुप्पट शुल्क द्यावे लागत आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, डिजिटल मोडच्या माध्यमातून शुल्क भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, वेळेची बचत आणि इंधन वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

येथून खरेदी करा अधिकृत फास्टॅग
एनआयएचएने म्हटले आहे की, मूळ फास्टॅग खरेदीसाठी तुम्हाला, https://ihmcl.co.in/ वर जावे लागेल किंवा MyFastag App चा वापर करावा लागेल. एनएचएआयने म्हटले की, ग्राहक लिस्टेड बँका आणि अथराईज्ड एजेंट्सकडून फास्टॅग खरेदी करता येतील. फास्टॅगशी संबंधित माहिती आयएचएमसीएल वेबसाइटवर सुद्धा दिली आहे.