खुशखबर ! ‘ही’ नवीन बॅटरी फक्त 10 मिनीटांमध्ये फुल चार्ज करेल इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल डिझेलमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. मात्र या गाड्यांना लागणाऱ्या चार्जींगमुळे हैराण होणाऱ्या नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केवळ 10 मिनिटात चार्ज होणारी बॅटरी बनवली असल्याचा दावा केला आहॆ. त्यानंतर या 10 मिनिटाच्या चार्जींगवर बॅटरी 320 किलोमीटर धावू शकणार आहे. मात्र या बॅटरीला प्रत्यक्षपणे बाजारात येण्यासाठी आणखी 10 वर्षांचा कालावधी लागू शकतो.

सध्या कोणतीही इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी चार्ज करण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागत असून सामान्य चार्जरने चार्जिंग केल्यास यासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागतो. वैज्ञानिकांनी याविषयी अधिक बोलताना सांगितले कि, आगामी काळात या गाड्यांची संख्या वाढणार असून यामुळे यावर मोठ्या प्रमाणात रिसर्च केला जात आहे. त्यामुळे या गाड्यांच्या वापरात वाढ होणार असून पेट्रोल डिझेलच्या गाड्यांशी बरोबरी करण्यासाठी अशा प्रकारच्या बॅटरी येणे गरजेचे आहे.

या बॅटरीला वैज्ञानिकांनी 60 डिग्री सेल्सियस तापमानापर्यंत गरम केले होते. त्यानंतर तिला थंड करण्यात आले. यामुळे बॅटरीची प्रसरण क्षमता तपासली जाणार असून बॅटरीचे आयुष्य देखील वाढणार आहे. दरम्यान, या प्रकारच्या बॅटरी बाजारात येणार असल्याने ग्राहकांची देखील या गाड्यांची मागणी वाढणार असून भारत सरकारने देखील या प्रकारच्या शोधासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

Visit : Policenama.com