‘या’ सोप्या उपायाने कमी होतो लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका !

पोलिसनामा ऑनलाईन टीम- भारतात आठवड्यात एकदिवस तरी उपवास करणारे असंख्य लोक आहेत. मात्र, हा उपवास देवासाठी केला जातो. विविध धर्मात उपवासाला खूप महत्व आहे. त्यातच भारतीय संस्कृतीत उपवासाला खूपच महत्व आहे. देव, धर्मासाठी उपवास केला जात असला तरी उपवासामुळे आरोग्य चांगले राहते. चांगल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी उपवास ही एक उत्तम प्रक्रिया आहे. नियमित उपवास केल्याने वजन कमी होते शिवाय डायबिटीसचा धोका कमी होतो, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

या संशोधनामुळे लठ्ठपणा आणि डायबिटीससारख्या अन्य आजारांच्या उपचारासाठी एक नवीन दिशा मिळाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पाणी सुद्धा सेवन करत नाहीत, त्यामुळे शुगर कंट्रोल करणाऱ्या प्रोटीन्सची निर्मिती भरपूर प्रमाणात होते, असे संशोधनात आढळून आले आहे. संशोधकांनी उपवासाचे फायदे अभ्यासण्यासाठी रमजानच्या उपवासाचा वापर केला. या अभ्यासात असे दिसून आले की, लागोपाठ ३० दिवस रोजा किंवा उपवास केल्याने शरीरात काही विशेष प्रकारचे प्रोटीन्स निर्माण होतात, या प्रोटीन्समुळे इन्सुलिन रेजिस्टेंस सुधारण्यात मदत होते. इन्सुलिन रेजिस्टेंसच्या स्थितीत पेशी प्रभावीपणे इन्सुलिनचा उपयोग करू शकत नाहीत. हे प्रोटीन जास्त चरबी आणि शुगर असलेल्या डाएटचे नकारात्मक प्रभावांपासून शरीराचे रक्षण करतात.

अभ्यासकांनी या संशोधनात १४ लोकांचा समावेश केला होता. या लोकांना रोज १५ तास सकाळपासून सायंकाळपर्यंत उपवास घडवला. अभ्यासकांनी उपवासाच्या ४ आठवड्यानंतर आणि उपवास संपल्यानंतर १ आठवड्यांनी सहभागी लोकांचे ब्लड टेस्टसाठी सॅम्पल घेतले असता यामध्ये ट्रोपोमायोसिन, १, ३ आणि ४ चे अधिक प्रमाण आढळून आले. हे प्रोटीन स्केलेटल मसल्स आणि हार्टच्या कॉन्स्ट्रक्शनसह पेशींना सुद्धा सुरक्षा देतात. फीडिंग आणि उपवास केल्याने शरीरात इन्सुलिन रेजिस्टेंस आणि वजन नियंत्रणात ठेवणारे प्रोटीन्सची निर्मिती होते. आणखी एका संशोधनात उपवासालाच वजन कमी करण्याचा प्रभावी उपाय सांगितले आहे. मात्र, हे उपाय करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्य घेतले पाहिजे.