‘त्या’ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी आमरण उपोषण सुरू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्याचे संपादक जितेंद्र पितळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषणास सुरू केले आहे.

police-suspension

याबाबत दिलेल्या निवेदनात जितेंद्र पितळे यांनी म्हटले आहे की, माझ्यावर 14 मार्च गुरूवारी राञी 9 ते 9.30 दरम्यान शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालक, मालक, क्लिनर व इतरांना हल्ला केला. शासकीय धान्याची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालक व ठेकेदारासह इतरांची या प्रकरणात पाठराखण करून पोलीस निरीक्षकांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास व त्यांच्यावर कडक कलमे न लावता त्यांना गुन्हा घडुन चार दिवस झालेनंतरही अटक केलेली नाही. आरोपींना तात्काळ अटक करावी. मला पोलीस संरक्षण मिळावे. धान्याची तस्करी करणाऱ्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार व पुरवठा निरीक्षकाला सहआरोपी करावे. प्रशासनाच्या गुन्हेगार बचाव धोरणाच्या विरोधात प्राणांतिक आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंत्री जानकर यांनी घेतला उपोषणाचा आढावा

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी भ्रमणध्वनीवरून पितळे यांच्याशी संपर्क साधून उपोषणाची माहिती घेतली.