”जन क्रांती” संघाची ‘ही’ आहे मागणी, पूर्ण ना झाल्यास उपोषणाचा इशारा !! 

अंबड : पोलीसनामा ऑनलाइन – दारू पिणे हे आजकल तरुणाई मध्ये फॅशन बनली आहे, जे दारू पित नाही त्याला लोक हसतात, पण दारू पिणं हे खरंच खूप मोठं काम आहे का ? या दारूमुळे खूप कुटुंब उध्वस्त झाले म्हणूनच तेथील तरुण वर्गाने बदल घडून आणण्यासाठी असं काही केलं. अंबड तालुक्यातील मौजे शिरनेर गावामध्ये मागील अनेक वर्षांपासून गावातील काही समाजकंटक पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मुळेच गावात अवैध रित्या दारू विकत आहेत, त्यामुळे गावातील तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे घरा-घरा मध्ये कौटुंबिक वाद वाढत आहे, तसेच गावातील व्यसनामुळे सावकारी कर्ज, आत्महत्या करण्याचे विचार, बेरोजगारी तसेच अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे.

या सर्व प्रकरणाला अनुसरून मौजे शिरनेर येथील ग्रामपंचायत देखील कोणतेही ठोस पाऊल न उचलता या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा असे समजले की पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी गावातील अवैद्यरित्या दारू विकणाऱ्यांकडून हे गैरव्यापार चालू ठेवू देण्यासाठी पैसे तर घेत नाही ना ? अशी चर्चा गावकऱ्यां मध्ये आहे.

हा सगळा प्रकार खूप गंभीर असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचं निदर्शनास येताच  गावामधील तरुण वर्ग व महिला यांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करण्याची मागणी अंबड तहसिलदार यांच्या कडे केली आहे, या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन, पोलिस अधिकारी, यांनी लक्ष द्यावे आणि त्वरीत दारु विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करावी.

अन्यथा जन क्रांती संघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदिप घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटने मार्फत गावातील जेष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग यांना एकत्रित करून लवकरच तहसिल कार्यलय येथे उपोषण करण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या अडचणींना प्रशासन जबाबदार असेल. अश्याप्रकारचे निवेदन जन क्रांती संघ तालुका संघटक किरण लिंगायत, आणि सोमनाथ भोजने, अविनाश भोजने, बळीराम गायके, अमोल मंडलिक, योगेश गायके, महादेव मंडलिक, हरिदास गायके, सचिन घुगरे, बबन गायके, चेतन्य बघाटे, विशाल मस्के, राम गायके यांनी दिले.