तुम्हाला शरीरातील चरबी घटवायचिय ? मग ‘या’ सवयी अवलंबा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – माणसाच्या शरीरात वाढलेली चरबी आणि वाढलेल्या वजनामुळे माणूस अनाकर्षक दिसतो मात्र त्याचबरोबर अनेक आजार देखील यामुळे माणसाला होऊ शकतात. त्यामुळे योग्य आहार आणि व्योम यामुळे माणूस स्वतःला  सुदृढ आणि फिट ठेऊ शकतो. अनेक जण आहारामध्ये तात्पुरते बदल करून, भरपूर व्यायाम करून वजन घटविण्यात यशस्वी होतात. मात्र त्यानंतर परत माणसाचे  वजन वाढल्याने चरबी देखील वाढते आणि आजाराला आमंत्रण मिळते. यासाठी कोणता आहार योग्य आहे चला पाहुयात

फायबरची  योग्य  मात्रा
ताज्या भाज्या, फळे, दुध यांसारख्या पदार्थांमधून माणसाला योग्य आणि सम प्रमाणात फायबर मिळते.यामुळे शरीरातील इन्सुलिन नियंत्रणात राहते आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका फार कमी प्रमाणात राहतो.  त्याचप्रमाणे  ताज्या भाज्या, मासे, अंडी, इत्यादी पदार्थांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात.त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने प्रथिने देखील योग्य स्वरूपात मिळतात.

‘व्हाईट कार्ब्स’ चा कमी वापर
व्हाईट कार्ब्स म्हणजेच मैदा,साखर, पास्ता, ब्रेड, केक सारखे पदार्थ थोड्याच प्रमाणात खाल्ले जावेत, तसेच बटाटा आणि भात देखील मर्यादित प्रमाणात खाल्ला जावा. त्याचबरोबर योग्य प्रमाणात  पाणी देखील पिण्याची गरज आहे. शक्य असेल तर चहा, कॉफी  यांसारखी पेये कमी करावीत किंवा बंद करावीत. त्याऐवजी  शक्य  असेल तर  साधे पाणी, नारळ पाणी, ताज्या भाज्यांचा किंवा फळांचा (साखरविरहित) रस, ताजे ताक यांसारख्या पेयांचा आपल्या आहारात समावेश करावा.

कार्डियो’चे  योग्य  प्रमाण
व्यायाम करताना  आपण  योग्य  प्रमाणात  कार्डिओ  करणे. चरबी कमी करण्याबरोबरच आपण  आहार, व्यायाम, आर्द्रता, यांच्याबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात घेतलेली झोप. योग्य झोप घेतल्याने  आपण केलेल्या व्यायामाचा  आपल्या शरीराला देखील फायदा होतो.

यामुळे या साध्या-साध्या  गोष्टींचे पालन करून देखील आपण  आपले शरीर सुदृढ देऊ शकतो. त्यामुळे  इतरांशी तुलना न करता सातत्याने प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे.