काँग्रेसच्या ‘या’ खासदाराच्या पत्नीचं वादग्रस्त विधान, म्हणाली – ‘नशिब रेप सारखं, थांबवू शकत नसाल तर ‘एन्जॉय’ करा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळचे काँग्रेस खासदार हिबी ईडन यांच्या पत्नीने फेसबुकवर रेप सारख्या गुन्ह्यावर विधान केले यामुळे सोशल मिडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. खासदार हिबी ईडन यांची पत्नी अन्ना लिंडा ईडन यांनी मंंगळवारी लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये नशीबाची तुलना बलात्काराशी केली आहे. त्यांनी लिहिले की नशीब बलात्कारासारखे आहे, जर तुम्ही याला रोखू शकत नसाल तर याचा आनंद साजरा करा. परंतू जेव्हा सोशल मिडियावर त्यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांनी फेसबूक वरुन आपली पोस्ट डिलिड केली.

काँग्रेस खासदाराच्या पत्नी अन्ना लिंडा ईडन यांनी फेसबूकवर पोस्ट करत कॅप्शन दिले होते की, नशीब बलात्कारासारखे आहे, जर तुम्ही याचा विरोध करु शकत नसाल तर त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. त्यांनी या पोस्ट बरोबर एक व्हिडिओ शेअर केला होता, जो त्यांच्या घरात पाणी शिरल्यानंतर मुलांना तेथून बाहेर काढण्यासंबंधित होता. एका व्हिडिओमध्ये त्या स्वत: सिज्लरचा आनंद घेताना दिसत होत्या. सोमवारी झालेल्या पावसाने कोची मध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, आणि संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाली होती.

हिबी ईडन यांनी आमदाराकीचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या तिकीटावर एर्नाकुलम लोकसभा जागेवरुन विजय मिळवला. हे क्षेत्र केरळमधील काँग्रेसचा गढ आहे. हिबी यांच्या पत्नी अन्ना मिडियाशी संंबंधित आहे. त्या कायम सोशल मिडियावर विविध व्हिडिओ शेअर करत असतात. मंगळवारी ज्या व्हिडिओवरुन वाद झाला तो या व्हिडिओच्या सीरीजमधील शेवट व्हिडिओ होता.

नशीबाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद चांगलाच पेटला. त्यांच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. आता पर्यंत अन्ना किंवा हिबी यांनी यासंबंधित कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like