फतेपूर सिक्रीमध्ये राज बब्बरचा पराभव करत राजकुमार चहर विजयी

फतेपूर सिक्री : पोलीसनामा ऑनलाईन –उत्तरप्रदेशमधील फतेपूरसिक्री लोकसभा निवडणूकही विविध मुद्यांनी गाजली. या निवडणुकीतही आरोप प्रत्यारोप झाले. परंतु मतदारसंघात खरी लढत भाजपच्या राजकुमार चहर, काँग्रेसचे राज बब्बर आणि बसपाच्या श्रीभगवान शर्मा यांच्यात झाली. या लढतीत भाजपचे राजकुमार चहर यांचा विजय झाला आहे. मतदारसंघात काँग्रेसचे राज बब्बर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळविली तर बीएसपीचे श्रीभगवान शर्मा यांनी तिसऱ्या क्रमांकांची मतं मिळविली.

फतेपूरसिक्री लोकसभा मतदारसंघात अत्यंत तुल्यबळ लढत झाली. या मतदार संघात भाजपचे राजकुमार चहर, काँग्रेसचे राज बब्बर, आणि बीएसपीचे श्रीभगवान शर्मा यांनी निवडणूक अत्यंत प्रतिष्टेची केली होती. काँग्रेस, बीएसपीआणि भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी तगडी प्रचार यंत्रणा राबविली होती. परंतु फतेपूरसिक्रीच्या जनतेनं काँग्रेसला आणि बीएसपीला कौल न देता भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे भाजपचे राजकुमार चहर विजयी झाले असून काँग्रेसचे राज बब्बर यांचा पराभव झाला आहे. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हाती आलेली आकडेवारी अशी आहे.

उमेदवार पक्ष मिळालेली मतं
राजकुमार चहर भाजप ६,१९,१०३
राज बब्बर काँग्रेस १,६३,३६१
श्रीभगवान शर्मा बसपा १,५९,२८९