टेरर फंडिंगमुळं पाकिस्तान ‘गोत्यात’, झालं ‘ब्लॅकलिस्टेट’ – 11 FATF मापदंडापैकी 10 मध्ये फेल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पाकिस्तानला त्या वेळी मोठा हादरा बसला जेव्हा एफएटीएफ एशिया-पॅसिफिक ग्रुप ने त्याला काळ्या यादीत टाकले. या ग्रुप ची मानके पूर्ण करण्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरला आहे. हे एपीजीच्या अहवालानुसार, पाकिस्तान ४० पैकी ३२ मानकामध्ये ती पूर्ण करण्यात असमर्थ ठरला आहे.

एफएटीएफ कडून काळ्या यादीत टाकले जाणे हा पाकिस्तान साठी मोठा धक्का आहे. आता फाइनेंशियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स एशिया-पॅसिफिक ग्रुप (एफएटीएफ एपीजी) याने पाकिस्तान ला पाक एशिया-पॅसिफिक ग्रुप (एपीजी) ची दहा मानके पूर्ण करण्यात अपयश आले आहे.

एपीजीच्या अंतिम अहवालानुसार, पाकिस्तान अन्य एका कायदेशीर आणि वित्तीय व्यवस्थेसाठी असलेल्या ४० पैकी ३२ मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. याशिवाय, दहशतवादला खतपाणी घालणे या विरोधातील सुरक्षा उपाया संदर्भातील ११ पैकी १० मानके पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानला ऑक्टोबर मध्ये टाकले जाईल. कारण कि, एफएटीएफच्या २७-कलमी कृती योजनेचा १५ महिन्यांचा कालावधी यावर्षी ऑक्टोबर महिन्यात संपत आहे.

ऑस्ट्रेलिया मधील कॅनबेरा शहरामध्ये एफएटीएफ ची बैठक होणार आहे. त्यामध्ये पाकिस्तानशी संबंधित एक म्युच्युअल इव्होल्यूशन रिपोर्ट (एमईआर) सादर झाल्यानंतर तो स्वीकारला जाईल. तत्पूर्वी पाकिस्तानने फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स कडे एक २७ सूत्री कृती योजना सादर केली आहे.

या संदर्भात एपीजीला समजून आले कि, इस्लामाबादकडून अनेक बाबतींत समाधानकारक बाबी होत नाहीयेत. सोबतच पैशांची अफरातफर रोखण्यासंदर्भातील प्रयत्नामध्ये विशेष पावले उचलल्याचे दिसत नाही. पाकिस्तानकडून, सुधारणेच्या ५० घटकांवर आश्वासक समर्थन प्राप्त होत नाहीये.

एपीजी हा एकूण नऊ देशांचा समावेश असलेला कार्यगट आहे. पाकिस्तान ४० मानकांपैकी तीन डझन मानकामधे सपशेल अपयशी ठरला आहे. तसेच ११ प्रभावकारी मानकापैकी १० मध्ये अपयशी ठरला आहे. पाकिस्तानला एमईआर आणि फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स अ‍ॅक्शन प्लॅन च्या दोन्ही आघाडीवर प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या एफएटीएफ च्या पूर्ण सत्रामध्ये काय तो अंतिम निर्णय घेतला जाईल.

अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इंग्लंड या देशांनी टाकलेल्या दबावानंतर फाइनेंशियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने पाकिस्तान ला संदिग्ध यादीमध्ये टाकलेले आहे. एपीजी कडून पाकिस्तान च्या विरोधात प्रतिकूल परिस्तिथी आढळून आल्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये नकारात्मक रडार वर ठेवले जाईल. याचाच अर्थ पाकिस्तानच्या अडचणी वाढत जाणार आहेत. पाकिस्तान संदिग्ध सूची मध्ये राहील आणि काळ्या यादीत टाकण्याचे प्रयत्न चालूच राहतील.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like